Shahu Chhatrapati Maharaj esakal
कोल्हापूर

Kolhapur News : शिवकालीन युद्धकलेला शासकीय मान्यता मिळायला हवी; शाहू छत्रपती महाराजांनी व्यक्त केली अपेक्षा

शालेय अभ्यासक्रमात मर्दानी खेळ अर्थात शिवकालीन युद्धकलेचा समावेश होता. कालांतराने तो त्यातून हद्दपार झाला.

सकाळ डिजिटल टीम

'भारतीय युद्धकला शिकण्यासाठी विदेशातून खेळाडू यायला हवेत. ही कला महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आहे.'

कोल्हापूर : शिवकालीन युद्धकलेला शासकीय मान्यता मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी येथे व्यक्त केली. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय शिवकालीन युद्धकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

सुमारे तेवीस वर्षांनंतर कोल्हापुरात ही स्पर्धा झाली. छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये कार्यक्रम झाला. शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘‘शालेय अभ्यासक्रमात मर्दानी खेळ अर्थात शिवकालीन युद्धकलेचा समावेश होता. कालांतराने तो त्यातून हद्दपार झाला. या खेळात मुलींचा सहभाग वाढत आहे, ही चांगली गोष्ट आहे‌. या खेळाला शासकीय मान्यता कशी मिळेल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे.’’

जिल्हाधिकारी राहूल रेखावार म्हणाले, ‘‘भारतीय युद्धकला शिकण्यासाठी विदेशातून खेळाडू यायला हवेत. ही कला महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आहे. युवा पिढीने ती आत्मसात करावी.’’ या वेळी लखन जाधव व राम यादव यांनीही मनोगत व्यक्त केले. शाहीर मिलिंद सावंत यांनी गीत सादर केले.

‘केएसए’चे सचिव माणिक मंडलिक, नंदकुमार बामणे, आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, सुखदेव गिरी, वस्ताद पंडित पोवार, नंदकुमार बामणे, प्रवीण हुबाळे, शस्त्र संग्राहक संदीप सावंत, बाबासाहेब पोवार, उदय गायकवाड उपस्थित होते. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून प्रविण आयवळे, संतोष सुतार, तर पंच म्हणून दिलीप जाधव, योगेश गुंजीकर, श्रीकांत खोत, विवेक कदम, अतुल शिंदे, अवधूत घाटगे, धनाजी सलगर, गणेश कदम, प्रविण हुले, प्रसाद देवणे, संदिप जाधव, सुरज केसरकर, धनाजी पोवार, प्रसाद कदम, योगेश पाटील, विक्रम शिंदे, उमेश कोडोलीकर यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल असा

  • प्रथम - सव्यासाची गुरुकुलम (गारगोटी)

  • द्वितीय - श्रीमंत योगी मर्दानी खेळ आखाडा (पाडळी खुर्द)

  • तृतीय - सह्याद्री प्रतिष्ठान (कोल्हापूर)

  • उत्तेजनार्थ - राजे मर्दानी आखाडा (पाचगाव)

  • शिस्तबद्ध - शिवगर्जना मर्दानी आखाडा

उत्कृष्ट खेळाडू

  • - वैभव मोहळ (श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा, पुणे)

  • - दीप्ती पाटील (खंडोबा तालीम मंडळ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT