Rajyasabha 2022 Political News | Dhananjay Mahadik News
Rajyasabha 2022 Political News | Dhananjay Mahadik News 
कोल्हापूर

राज्यसभा रणधुमाळी, धनंजय महाडिकांचा 25 जिल्ह्यांत झंझावाती दौरा

सकाळ डिजिटल टीम

धनंजय महाडिक यांनी सर्वपक्षीय आमदारांच्या भेटी घेतल्या असून निवडणुकीसाठी घडामोडींना वेग आलाय

कोल्हापूर - राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपकडून अपक्ष आमदारांसह २५ जिल्ह्यांतील आमदारांच्या भेटीगाठी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार धनंजय महाडिक यांनी सर्वपक्षीय आमदारांच्या भेटी घेतल्या. भाजप पदाधिकारी, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, कारखाना संचालक आणि युवाशक्तीचे पदाधिकाऱ्यांनी यंत्रणा राबवली. (Rajyasabha 2022 Political News)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार दोन तासांत राज्यातील २९ अपक्ष, तसेच इतर आमदारांना शनिवार व रविवारी कसे भेटता येईल, याचे नियोजन केले. त्यासाठी पंचवीस पथके तयार केली. धनंजय महाडिक यांनी दहा अपक्ष व अन्य आमदारांच्या भेटी घेतल्या. त्यात कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले, बहुजन विकास आघाडी पार्टीचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, अपक्ष श्रीमती गीता जैन, जनसुराज्यचे विनय कोरे, अपक्ष प्रकाश आवाडे यांचा समावेश होता.

मनसेचे प्रमोद ऊर्फ राजू पाटील, समाजवादी पार्टीचे आबू आझमी व रईस शेख, मंत्री शंकरराव गडाख व अपक्ष महेश बालदी यांच्यादेखील ते भेटी घेणार आहेत. माजी आमदार अमल महाडिक यांनी गोंदियाचे अपक्ष विनोद अग्रवाल व चंद्रपूरचे अपक्ष किशोर जोरगेवार यांच्या भेटी घेतल्या. पृथ्वीराज महाडिक व राजन महाडिक यांनी अमरावती जिल्ह्यातील स्वाभिमानीचे देवेंद्र भुयार व प्रहार जनशक्तीचे राज्यमंत्री बच्चू कडू, राजकुमार पटेल आणि अपक्ष रवी राणा यांच्याशी चर्चा केली.

नागपूर जिल्ह्यातील अपक्ष आशिष जैस्वाल व भंडारा जिल्ह्यातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याही भेटी घेतल्या. राहुल महाडिक आणि ओमवीर महाडिक यांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे व नांदेड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे लोहा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांची भेट घेऊन भाजपच्या उमेदवारांना सहकार्य करण्याची विनंती केली.

सम्राट महाडिक यांनी एमआयएम पक्षाचे धुळे शहराचे आमदार फारुख शहा व मालेगावमध्ये मोहम्मद मुफ्ती, जळगाव मुक्ताईनगरचे अपक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. प्रा. जयंत पाटील आणि स्वरूप महाडिक यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे अपक्ष संजय मामा शिंदे व बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या भेटी घेतल्या.

महाडिक-कोरे भेट

वारणानगर - भाजपचे राज्यसभेचे उमेदवार माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार डॉ. विनय कोरे यांची भेट घेऊन राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. भेटीवेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष प्रा.जयंत पाटील, महापालिकेचे नगरसेवक मुरलीधर जाधव उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT