the body reached Karnataka blocked by the state 
कोल्हापूर

कोरोनाच्या विळख्यात 'करुणा' हरली... मृतदेह कर्नाटकाच्या सीमेवरुनच परतला...

संजय साळुंखे

निपाणी - कोरोनाने आजवर आपले अनेक रंग दाखविले आहेत. माणसांपेक्षा नियम कधीही मोठे नकोत, याचा प्रत्येय मृतदेहाविषयी देखील सहानुभूती आटल्याने आला आहे. राज्यबंदीच्या नियमाने माणुसकी हद्दपार झाल्याने कारवारमधील असिफ सय्यद यांचा मृतदेह अखेर कराडमध्ये विसावला. अशाप्रकारे कोरोनाच्या विळख्यात 'करुणा' देखील हरवून गेल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.

राज्यबंदीच्या अडसराने गाठले

कारवार येथून गुजरातमधील भरूचला गेलेले असिफ लतीफ सय्यद हे पुन्हा परतलेच नाहीत. त्यांना तेथेच नियतीने हृदयविकाराच्या झटक्याच्या रुपाने गाठले. मृतदेह कर्नाटकाच्या सीमेवर कोगनोळीपर्यंत आला असता राज्यबंदीच्या अडसराने देखील गाठले. अखेर कोल्हापूर व्हाया कराडला न्यावा लागून तेथे मृतदेहावर दफनविधी झाले. त्यात माणसांपेक्षा नियमच मोठे बनल्याचे स्पष्ट झाले. माणसांसाठी बनवलेले नियम माणसांसाठीच कामाला येत नसल्याने कित्येकांना असा त्रास सहन करावा लागत आहे. कोगनोळी व कागल या कर्नाटक-महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावरील सीमा तपासणी नाक्यावर अशा कितीतरी घटना घडत आहेत. त्यातील काही उघडकीस येत आहेत, तर काही हवेतच विरत आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी आपत्कालीन स्थितीत आपल्यातील माणुसकीचे दर्शनही घडविले आहे. पण बिकट परिस्थितीत कठोर वागण्याच्या प्रसंगात अधिकाऱ्यांचा दोष नसून ते शासनासह वरिष्ठांच्या हुकुमाचे दावेदार आहेत. नियम मोडला की टांगती तलवार असल्याने त्यांचाही नाईलाज होत आहे. त्यावर शासनाकडूनच प्रसंग पाहून निर्णय घेण्याची लवचिकता गरजेची आहे.

कठोर नियमांबाबत फेरविचाराची वेळ

लॉकडाउनचे नियम शिथील होत असताना कोरोना अनेकांना मगरमिठीत घेत आहे. त्याचा फटका 'इंडिया'तील नव्हे तर भारतातील कित्येक गरीब, महिला, वृद्ध, बालकांसह सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे जिल्हाबंदी, राज्यबंदीसारख्या कठोर नियमांबाबत फेरविचार करण्याची वेळ आली आहे.
 

'सीमाभागातील नागरिकांना कर्नाटक-महाराष्ट्रात अत्यावश्यक विविध कारणांनी जाण्याची वेळ येते. आरोग्यासह मरणासारख्या बाबतीत तरी नियम शिथिल करून मुभा देऊन गैरसोय दूर करावी.'
- प्रा. शरद कांबळे,
 निपाणी-सौंदलगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

पंचनाम्याचे निकष शेतकऱ्यांच्या जिव्हारी! अतिवृष्टीच्या भरपाईसाठी ‘हे’ निकष अडचणीचे; ॲग्रीस्टॅक क्रमांक, ई-पीक पाहणी नोंदीचा अडथळा; शेतातील जिओ टॅगिंग फोटोचीही अट

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

SCROLL FOR NEXT