kolhapur crime News Esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime: सोळाव्या वर्षी जबरदस्तीनं पळवून नेलं, 'तिच्या'शी विवाह करून मूल जन्माला घातलं; पतीसह सासू-सासऱ्याविरुध्द गुन्हा

नितीन बापू मोरे याने नात्यातील मुलीला तिच्या वयाच्या सोळाव्या वर्षी जबरदस्तीने पळवून नेले.

सकाळ डिजिटल टीम

दोन दिवसांपूर्वी पतीने तिला बेदम मारहाण केली. या त्रासाला कंटाळून सहा महिन्याच्या मुलास सोबत घेऊन पीडित महिला माहेरी गेली.

नागाव : अल्पवयीन मुलीचे (Minor Girls) अपहरण, बालविवाह, मूल जन्माला घालण्यास भाग पाडणे आणि शारीरिक व मानसिक छळ अशा विविध गुन्ह्यांमध्ये पती, सासू आणि सासरे यांच्यावर शिरोली एमआयडीसी पोलिस (Shiroli MIDC Police) ठाण्यात काल गुन्हा दाखल झाला.

शिरोली एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीमधील एका गावातील पती नितीन बापू मोरे, सासरा बापू मोरे आणि सासू सीता बापू मोरे अशी संशयितांची नावे आहेत. हा गुन्हा दाखल करण्यासाठीही पीडित महिलेला नाहक त्रास सहन करावा लागला.

याबाबत मिळालेली माहिती अशी : नितीन बापू मोरे याने नात्यातील मुलीला तिच्या वयाच्या सोळाव्या वर्षी जबरदस्तीने पळवून नेले. तिच्याशी विवाह करून तिला मूल जन्माला घालण्यास भाग पाडले. आणि नंतर पतीसह सासरच्या नातेवाईकांकडून पीडित मुलीचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केला.

दोन दिवसांपूर्वी पतीने तिला बेदम मारहाण केली. या त्रासाला कंटाळून सहा महिन्याच्या मुलास सोबत घेऊन पीडित महिला माहेरी गेली. तेथून आपल्या आईसह तिने बाल कल्याण समितीकडे धाव घेतली. बाल कल्याण समितीने दिलेल्या पत्रानुसार पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता आव्हान शहरी नक्षलवादाचं, ६१ माओवाद्यांच्या आत्मसमर्पणावेळी फडणवीसांचं विधान

Gokul Milk Politics : शौमिका महाडिकांनी कंबर कसली, डिबेंचर्सच्या मुद्दावरून ‘गोकुळ’वर जनावरांसह मोर्चा...

Latest Marathi News Live Update : महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबतची बैठक संपली

Lac Or Lakh: चेकवर 'Lakh' लिहावं की ‘Lac’? आरबीआयने दिलं स्पष्टीकरण

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली अन् इथे स्टार ऑल राऊंडरला दुखापत झाली; महत्त्वाच्या सामन्याला मुकणार...

SCROLL FOR NEXT