Dhananjay Mahadik esakal
कोल्हापूर

'त्या' हल्ल्याप्रकरणी आमदार सतेज पाटलांवर गुन्हा दाखल होणार? खासदार धनंजय महाडिकांनी दिली महत्त्वाची अपडेट

संचालक प्रकाश चिटणीसांवर झालेल्या हल्ल्याचे कनेक्शन सतेज पाटील यांच्यापर्यंत पोहचत असेल तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा.

सकाळ डिजिटल टीम

कालचा दिवस हा सहकारातील काळा दिवस होता. महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत असे कधी घडले नव्हते.

कोल्हापूर : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत, असे सांगणारे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्याकडे बंगाली बाबा आहेत, जादूटोणा, ज्योतिष सांगणे त्यांना जमते’, अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी पाटील यांच्यावर टीका केली. भाजप कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कनेक्शन सतेज पाटील यांच्यापर्यंत पोहचत असेल तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी श्री. महाडिक यांनी केली. श्री. पाटील यांनीच कार्यकर्त्यांना उचकवण्याचे काम केले. हल्लेखोरांवर मोकाची कारवाई व्हावी, अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

शिंदे गटाचे दहापैकी सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार आहेत, असे लेखी पत्र दिले आहे, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला होता. त्यावर महाडिक म्हणाले, ‘भाजपच्या तिकिटावर शिवसेना लढणार असेल, तर शिवसेना घोषणा करेल. काँग्रेसच्या व्यक्तींना ही घोषणा करण्याची आवश्यकता नाही. त्याची चिंता त्यांनी करू नये. याचे ज्योतिषशास्त्र त्यांनी सांगू नये, आमचे अंतर्गत विषय आम्ही ठरवू.’

‘नियोजन समितीतील निधी वाटपावरून सतेज पाटील काहीही बरळतात. ते पालकमंत्री असताना विरोधकांना एकही रुपयाचा निधी दिला नाही. त्यामुळे त्यांना आरोप करण्याचा अधिकार नाही. त्यांनी त्यावेळी विरोधकांना किती निधी दिला हे दाखवावा’, असे आव्हानही महाडिक यांनी दिले.

ते म्हणाले,‘कालचा दिवस हा सहकारातील काळा दिवस होता. महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत असे कधी घडले नव्हते. कालच्या मोर्चात आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांना उचकवण्याचा प्रयत्न केला. मोर्चात शेतकरी कमी आणि गुंड जास्त होते. श्री. चिटणीस यांना मारहाण करून सतेज पाटील यांनी गुंड प्रवृत्तीचे दर्शन दिले. हा एक पूर्वनियोजित गटाचा भाग आहे.’

पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढवणार

महाडिक म्हणाले, ‘सद्यस्थितीला कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडेच आहेत. शिंदे गटाने बैठका घेणे हे क्रमप्राप्त आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या शेकडो बैठका यापूर्वी झालेल्या आहेत. ‘अबकी बार, ४०० पार’ हा उद्देश ठेवूनच भारतीय जनता पक्षाची तयारी सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यास एक जागा लढवण्याची आमची तयारी आहे. पक्ष जो आदेश देईल तो मी स्वीकारणार आहे. मला लोकसभा लढवण्यास सांगितल्यास लढणार आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Case: ''वाल्मिक कराडच्या बंगल्यातून अजूनही सूत्र हलतात, धनंजय मुंडेंचा संबंध नाही'', ज्ञानेश्वरी मुंडेंनी स्पष्ट सांगून टाकलं

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Stock Market Today: शेअर बाजार लाल रंगात बंद! मोठी घसरण झाली तरी हे स्टॉक मात्र वाढले

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

SCROLL FOR NEXT