Challenges Facing the Mahavikas Front; Municipal elections on their own
Challenges Facing the Mahavikas Front; Municipal elections on their own 
कोल्हापूर

महाविकास आघाडीसमोरील आव्हाने ;  महापालिका निवडणूक एकत्रित की स्वबळावर 

युवराज पाटील

कोल्हापूर  : मुंबईसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवेल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर कोल्हापूर महापालिकेची निवडणूकही याच पॅटर्नवर आधारित असणार आहे. तिन्ही पक्ष एकत्रित लढणार, की निवडणुकीनंतर एकत्रित येणार, हेही महत्त्वाचे आहे. 
मार्चअखेरीस अथवा एप्रिलमध्ये महापालिका निवडणूक होत आहे. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याआधीच कोल्हापुरात 2015 पासून कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा पॅटर्न आस्तित्वात होता. शिवसेनेच्या चारही सदस्यांनी महापौर निवडीवेळी सत्तारूढ गटाला सहकार्य केले. सत्तारूढ गटाचे संख्याबळ जमत होते, त्यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. ज्यावेळी बाजूने मतदानाची गरज होती. त्यावेळी सेनेचे सदस्य सत्तारूढ गटाच्या बाजूने उभे राहिले. गेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर यांचा झालेला पराभव जिव्हारी लागणारा होता. पालकमंत्री सतेज पाटील यांनी कसबा बावडा परिसरातून कॉंग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या बाजूने ताकद उभी केली. निकालाची गणितेच बदलून गेली. त्याचाही विचार महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी करताना होणार आहे. 
शिवसेनेच्या तिकिटावर चार सदस्य निवडून आले तरी त्यांच्या भूमिका कॉंग्रेसच्या बाजूने राहिली.  क्षीरसागर यांच्या पराभवात नुसती कॉंग्रेस नव्हे तर शिवसेनेतील एक गट पडद्यामागून विरोधात उभा राहिला. कॉंग्रेस, राष्ट्रवादीने उमेदवार पाडण्याऐवजी शिवसेनेचेच उमेदवार गेल्या निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न झाला. त्याचा हिशेब विधानसभा निवडणुकीवेळी झाला. आता त्याची परतफेड महापालिका निवडणुकीला केली जाईल. याचा अर्थ शिवसेनाच पुन्हा शिवसेनेचे नुकसान करेल, असे चित्र आहे. 
कॉंग्रेसचा विचार करता मंत्री पाटील यांच्यासाठी पुढील वर्षी होणारी विधानपरिषद निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसच्या मिळून किमान साठ जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे. राष्ट्रवादीचे सध्यातरी 20 जागा निवडणून आणण्याचे लक्ष्य आहे, कॉंग्रेस 27 वरून 40 जागापर्यंत मजल मारण्याच्या तयारीत आहे. घडामोडीत शिवसेनेसमोर आव्हान आहे, त्या चार जागा टिकविण्याचे आव्हान आहे. कोल्हापूर उत्तर, तसेच दक्षिण या दोन्ही मतदारसंघाचा समावेश होता. 


एकमेकांच्या पायात पाय नसणार? 
विधानसभेला शिवसेना आणि महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस,क्राष्ट्रवादीला साथ हा आजपर्यंतचा पॅटर्न आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असल्याने तिन्ही पक्षांची किमान एकमेकाच्या पायात पाय घालण्याची तयारी असणार नाही, ही जमेची बाजू आहे. निवडणुका एकत्रित लढण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर कोल्हापुरात हा पॅटर्न यशस्वी होतो, की नाही हे निकालानंतरच स्पष्ट होईल. 


भाजपच्या पराभवासाठी महापालिका निवडणूक तिन्ही पक्षांना स्वतंत्रपणेच लढवावी लागेल. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंबंधी मत व्यक्त केले आहे. निवडणूक स्वतंत्र लढावी यावर कॉंग्रेसचे एकमत आहे. निवडणुकीनंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. 
- सतेज पाटील, पालकमंत्री 

महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे लढायचे की स्वतंत्रपणे यासाठी पक्षश्रेष्ठी आदेश देतील. त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. 
हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री. 


आगामी महापालिका निवडणूक शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. याबाबत शंका नाही. वरिष्ठ आदेश देतील, त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल, पण त्याचवेळी शिवसेनेचा आमदार पाडण्यात कोणाचा हात होता, हे ही वरिष्ठांना कळविले जाईल. 
- राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष. राज्य नियोजन मंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT