Kolhapur : चंदगड वनक्षेत्रात वाघाचा अधिवास sakal media
कोल्हापूर

Kolhapur : चंदगड वनक्षेत्रात वाघाचा अधिवास

पावलांचे ठसे, शिकारीवरून दुजोरा

संजय पाठक - सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: जिल्ह्यातील घनदाट जंगली भाग असलेल्या चंदगड संवर्धन राखीव वनक्षेत्रात वाघाने शिकार केल्याचे पुरावे मिळाल्याने या क्षेत्रात वाघाच्या अस्तित्वाला दुजोरा मिळाला आहे. येथे पावलांचे ठसेही मिळाले आहेत. हा परिसर संरक्षित क्षेत्र झाल्याने वाघाच्या अधिवासासाठी वातावरण पूरक ठरल्याची बाब अधोरेखित झाली आहे.

चंदगडचे जंगल कर्नाटक, गोव्याच्या जंगली सीमेला जोडले आहे. या भागात यापूर्वीही वाघांचा अधिवास आढळला होता. कर्नाटकातील दांडेली, भीमगड, महाराष्ट्रातील तिलारी, दोडामार्ग, आजरा, भुदरगड, चंदगड, राधानगरी, विशाळगड मार्गे चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना अभयारण्यापर्यंत वाघांचे भ्रमण होत असते. गतवर्षी आंबोली, दोडामार्ग तसेच चंदगड संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर झाले. त्यामुळे या भागातील वन्यजीवांचा भ्रमण मार्ग जोडण्यास मदत होत आहे.

आंबोलीत यापूर्वी वाघाचे दर्शन झाले होते, तर लॉकडाउन काळातही वाघ तेथे दिसला होता. त्या पाठोपाठ गेल्या काही दिवसांत येथे वाघाने रेड्याची शिकार केल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्याच ठिकाणी वाघाच्या पावलांचे ठसेही आढळले आहेत. त्यावरून या परिसरात वाघाचा अधिवास असल्याची बाब ठळक झाली आहे, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली आहे.

चंदगड ते कोयना टापूतील सात तालुक्यांतील जंगली भागाचा पट्टा संवर्धन राखीव क्षेत्र आहे. यात वन्यजीवांचा भ्रमण मार्ग अखंड राहिला आहे. प्रजनन क्षेत्रातील वाघ व इतर तृणभक्षक प्राणी त्या क्षेत्रातील जोडणाऱ्या जंगलात स्वतंत्र अधिवास निर्माण करू शकतात, असाही वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT