Chandrakant Patil say Mushrif should pay attention to farmers from nationalized banks 
कोल्हापूर

मुश्रीफांनी राष्ट्रीयकृत्त बॅंकांकडील शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे : चंद्रकांत पाटील

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने खरीप हंगामात 158 टक्के पीक कर्जवाटप केले आहे ही बाब निश्‍चितच कौतुकास्पद आहे, तथापि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील व राज्यातील राष्ट्रीयकृत्त बॅंकांकडील थकित शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.

राज्यात खरीप पीक वाटपाची परिस्थितीत समाधानकारक नाही. जिल्हा व राष्ट्रीयकृत्त बॅंकांना 45 हजार 785 कोटी रूपयांचे उद्दीष्ट असताना केवळ 12 हजार 315 कोटीचे वाटप झाले आहे. कर्जवाटप पाहता 30 टक्केच उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. यामध्ये जिल्हा बॅंकांची परिस्थितीत कुमकुवत झाल्याने राष्ट्रीयकृत्त बॅंकांनी 32 हजार 261 कोटीचे उद्दीष्ट असताना केवळ 4900 कोटीचे कर्ज वाटप केले आहे. राज्यात बहुंताश भागात वेळेवर पाऊस सुरू झाल्याने खरीपाची कामेही वेगाने सुरू आहेत मात्र शेतकऱ्यांची पीककर्जाअभावी कोंडी झाल्याचे श्री. पाटील यांनी या पत्रकात म्हटले आहे.

राज्य शासनाने कर्जमाफी योजनेतील दोन लाखांच्या आतील थकीत रक्‍कम त्या बॅंकांना मिळाली नसल्याने अशा शेतकऱ्यांना बॅंकांनी कर्जपुरवठा केलेला नाही. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपातर्फे राज्यभर बॅंकांसमोर आंदोलन केले. याचाच एक भाग म्हणून पीक कर्ज वाटपातील बॅंकांची अनास्था याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या आंदोलनाची माध्यमांनी दखल घेतली असताना श्री. मुश्रीफ यांना मात्र आमचे बॅंकेसमोरील आंदोलन दिसून आलेले नाही, असे या पत्रकात म्हटले आहे.

बरेच शेतकरी राष्ट्रीयकृत्त बॅंकांकडून कर्ज उचल करतात. त्या बॅंकांकडे विनाकपात मिळणारी जास्तीची उचल मर्यादा पाहून त्यांचा कल राष्ट्रीयकृत्त बॅंकेकडे आहे. अशा शेतकऱ्यांपैकी कर्जमाफीची रक्‍कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना या बॅंका कर्ज देत नसून त्यांच्या थकबाकीचे काय ? हा प्रश्‍न श्री. मुश्रीफ दुर्लक्षित करत असल्याचे श्री. पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

14 जिल्हा बॅंकांचे दुर्लक्ष

आपण राज्याचे मंत्री आहोत हे ध्यानात घेऊन श्री. मुश्रीफ यांनी या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. त्याचवेळी राज्यातील 14 जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी राज्य सरकारच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करून थकित व कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जवाटप केलेले नाही याकडेही श्री. मुश्रीफ यांनी राज्याचे अनुभव मंत्री म्हणून लक्ष द्यावे. जिल्हयातील राष्ट्रीयकृत बॅंकांकडील कर्जदारांची कर्जमाफी प्राप्त न झाल्याने या शेतकऱ्यांच्या खरीप कर्जाचे काय करणार याचेही उत्तर त्यांनी द्यावे, असे या पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कर्नाटकमध्ये मतचोरी पकडल्याचे राहुल गांधी यांनी पुरावे केले सादर

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT