cm uddhav thackeray Permission granted to film shooting started in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात आता लाईट- कॅमेरा- ऍक्‍शन...! मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल; "सकाळ'च्या खमक्‍या भूमिकेला यश,

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - राज्यातील ग्रीन किंवा ऑरेंज झोनमध्ये दक्षता घेवून व सर्व नियम पाळून शुटींग आणि निर्मितीनंतरची प्रक्रिया सुरू करता येईल, अशी ग्वाही आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. या पार्श्‍वभूमीवर आता येथील शुटींग लवकरच सुरू होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एकूणच मनोरंजन क्षेत्राची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत करण्यासाठी कोल्हापूरने गेली महिनाभर प्रयत्न सुरू केले होते. सध्या कोल्हापूर हाच शुटींगसाठी सक्षम पर्याय असून अनेक मोठ्या प्रोजेक्‍टनी येथे शुटींगसाठी येण्याची तयारी दर्शवली आहे. या साऱ्या प्रक्रियेत कलाकार व तंत्रज्ञांच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला तर "सकाळ'ने या सर्व घटकांना झूम मीटिंग ऍपच्या माध्यमातून एकाच प्लॅटफॉर्मवर आणले आणि या साऱ्या प्रयत्नांना खमके पाठबळ देत कोल्हापुरात लवकरात लवकर शुटींग सुरू व्हावीत, अशी स्पष्ट भूमिका घेतली. 

 राज्यातील मनोरंजन उद्योगातील विशेषत: मराठी चित्रपट, नाटक, मालिकांचे निर्माते, कलाकार यांच्याशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. शुटींग करताना कंटेनमेंट झोन्समध्ये लोकेशन्स नाहीत ना तसेच लोकांची संख्या, त्यांचे राहणे-जेवणे या गोष्टी देखील पाहाव्या लागतील. संपादन प्रक्रिया करणाऱ्या स्टुडीओमध्ये परवानगी द्यायची असेल तर तेथील जागा, वातानुकुलित यंत्रणा याबाबतही सुचना द्याव्या लागतील. पावसाळ्यापूर्वी अशी काही शुटींग शक्‍य होतील का ते पाहण्यास सांस्कृतिक कार्य विभाग व निर्मात्यांना त्यांनी यावेळी सांगितले. 

मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ संजय मुखर्जी आदी यावेळी उपस्थित होते. या कॉन्फरन्सचे सूत्रसंचालन सुबोध भावे, आदेश बांदेकर यांनी केले. खासदार डॉ अमोल कोल्हे, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले, प्रसाद कांबळी, निखिल साने, सुनील फडतरे, केदार शिंदे अतुल परचुरे, अवधूत गुप्ते, मंगेश कुलकर्णी, रवी जाधव, विजू माने, राहुल देशपांडे, अजय भालवणकर, मुक्ता बर्वे, केदार शिंदे, सुकन्या मोने, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रशांत दामले, सुभाष नकाशे, प्रसाद महाडकर, शरद पोंक्षे, विद्याधर पाठारे आदींनी सूचना केल्या. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT