Chandgad Police Station esakal
कोल्हापूर

Chandgad Police : चंदगड पोलिस ठाण्यातील हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; साडेचार हजारांची लाच मागितल्याचा आरोप

आठवडाभरातील तालुक्यातील ही दुसरी कारवाई आहे.

सकाळ डिजिटल टीम

खरुजकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली.

चंदगड : येथील पोलिस ठाण्यातील (Chandgad Police Station) हवालदार राजीव शामराव जाधव (वय ४४, रा. कौलगे, ता. गडहिंग्लज, सध्या रा. काजू बाग, गडहिंग्लज) याने तक्रारदाराकडून साडेचार हजार रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Department) त्याला अटक करून गुन्हा दाखल केला.

आठवडाभरातील तालुक्यातील ही दुसरी कारवाई आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दाटे (ता. चंदगड) येथील सुनील खरुजकर यांच्यासह आई व भाच्यावर शेजारी राहणाऱ्या संजना खरूजकर यांनी मारहाणीची तक्रार दाखल केली होती.

त्याचा तपास हवालदार जाधव याच्याकडे होता. त्याने खरुजकर यांना अटक न करण्याबाबत व वाढीव कलम न लावण्यासाठी त्यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती साडेचार हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत खरुजकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली.

पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, बापू साळुंखे, बंबर्गेकर, सुनील घोसाळकर, विकास माने, सचिन नाईक, संदीप काशीद, मयूर देसाई, रुपेश माने, उदय पाटील यांच्या पथकाने या संदर्भात पडताळणी केली. त्यामध्ये जाधव याने साडेचार हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाल्याने आज त्याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. आठवड्यापूर्वी पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंता सुभद्रा कांबळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT