corona patient travel in doctor car at kolhapur ichalkaranji 
कोल्हापूर

कोरोनाबाधिताने केला महिला डाॅक्टरांच्याच गाडीतून प्रवास अन् पुढे घडले असे काही.....

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - जयसिंगपूर येथील तरुणाचा कोरोना पॉझीटीव्ह अहवाल आल्यानंतर येथील आयजीएम रुग्णालयात खळबळ माजली आहे. या रुग्णाचे या ठिकाणाच्या वास्तव्याबरोबरच तो जयसिंगपूरला परत जातांना एका महिला डॉक्टरच्या गाडीतून प्रवास केला आहे. या तरुणामार्फत कोठे - कोठे संपर्क झाला, याची आता तातडीने माहिती घेण्याचे काम प्रशासन करीत आहे.
दरम्यान, हा तरुण सोलापूर ते इचलकरंजी या मार्गाने प्रवास करतांना त्याच्या सोबत असणार्‍या अन्य आठ जणांच्या अहवालाकडेही आता लक्ष लागून राहिले आहे. आयजीएम रुग्णालयातही त्याचा वावर झाल्यांने कर्मचारी आणि डॉक्टरांच्यातही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिरोळ तालुक्यात बाहेरुन येणार्‍या सर्व नागरिकांना तपासणीसाठी येथील आयजीएम रुग्णालयात पाठविले जाते. जयसिंगपूरमधील हा तरुण स्वॅब देवून झाल्यानंतर त्याला फारशी लक्षणे नसल्यांने तो गावी गेला. जातांना जयसिंगपूरातील एका महिला डॉक्टराच्या गाडीतून प्रवास केला. ही महिला डॉक्टर गुजरात येथून आली होती. आपला स्वॅब दिल्यानंतर परत जातांना हा तरुण व त्याचा आणखी एक सहकारी असे दोघेजण महिला डॉक्टराच्या गाडीतून गेले होते.

आजचा अहवाल आल्यानंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रुग्णास फारसे कोणतीच लक्षणे नसल्यामुळे त्याच्या बाबत किती दक्षता याबाबत घेण्यात आली, हा ही एक मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचारी व डॉक्टर यांच्यातही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT