corona positive report negative of four year boy in kolhapur ichalkaranji 
कोल्हापूर

'माझं बाळ कोरोनामुक्त झालं, डॉक्टरांच्या रुपात मला देव भेटले'  

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - कोरोनामुक्त झालेल्या चार वर्षाच्या मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज देताना आयजीएम रुग्णालय परिसर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलीस, पालिका आणि रुग्णालय प्रशासन यांनी पुष्पवृष्टी करीत कोरोनामुक्त झालेल्या या मुलाला सलाम केला. यावेळी मुलासह त्याची आई सोबत होती. या दोघांना रुग्णालयातून घरी सोडले असले तरी त्यांना खबरदारी म्हणून पुढील कांही दिवसांसाठी हातकणंगले येथे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले.


कोले मळ्यातील वृध्दाला कोरोनाची लागण झाल्यानंतर वस्त्रनगरी धास्तावली होती. पाठोपाठ त्याच्या चार वर्षीय नातवालाही कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता वाढली होती. या मुलाला सीपीआर रुग्णायात न पाठविता आयजीएम रुग्णालयातच उपचार सुरु ठेवले. गेले 14 दिवस त्याच्यावर डॉ. शोएब मोमीन व डॉ. संदीप मिरजकर या बालरोग तज्ञांनी उपचार सुरु ठेवले. यासाठी अन्य स्टाफचेही सहकार्य मिळत गेले. अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीत या रुग्णालयाने हे मोठे आव्हान यशस्वीपणे पेलले. 

या मुलाचे पुढील दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे हा मुलगा कोरोनामुक्त झाला. त्याला आज रुग्णालयातून डिसचार्ज देताना पोलीस, पालिका व रुग्णालय प्रशासनाने सलाम केला. त्याच्यावर पुष्पवृष्टी करुन रुग्णालयातून त्याला निरोप दिला. रुग्णवाहिकेतून त्याच्यासह आईला खबरदारी म्हणून पुढील काही दिवसासाठी संस्थात्मक विलकीकरण करण्यात आले आहे.
 यावेळी प्रांताधिकारी विकास खरात, पोलीस उपअधिक्षक गणेश बिरादार, मुख्याधिकारी दीपक पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ.आर.आर. शेटे, डॉ. श्रीकांत सुर्यवंशी, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार आदी उपस्थीत होते. 

दरम्यान, मुलांवर उपचार केलेल्या सर्व वैद्यकीय कर्मचार्‍यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आपल्या प्रतिक्रीया व्यक्त करताना हे कर्मचारी भावूक झाले. यावेळी मुलाच्या आईला आपले अश्रू आवरता आले नाहीत. 


कोल्हापुरातील प्रेत्येक घटना घडामोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT