Corona Swabs report will now be available on mobile
Corona Swabs report will now be available on mobile 
कोल्हापूर

स्वॅबचा अहवाल मिळणार आता मोबाईलवर 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयासह सरकारी रूग्णालयात कोरोनाच्या तपासणीसाठी दिलेल्या स्वॅबचा अहवाल आता संबंधितांच्या मोबाईलवरच मिळणार आहे. यासाठीचे तंत्रज्ञान राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने शेंडा पार्कातील प्रयोगशाळेत विकसित करण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे स्वॅब दिल्यानंतर अहवालाच्या प्रतीक्षेत चार-पाच दिवस असणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

दरम्यान, कोणत्याही मोबाईलवर हा संदेश मिळेल. या संदेशाखालीच त्या व्यक्तीच्या अहवालाची प्रत लिंकवर दिली जाणार आहे. या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर संबंधिताला आपल्या अहवालाची प्रिंटही काढता येणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे स्वॅब दिलेल्या व्यक्तींबरोबरच त्याच्या कुटुंबीयांची होणारी घालमेलही थांबणार आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण 26 मार्च रोजी सापडला. त्याच दरम्यान जिल्ह्यात स्वॅब तपासणीसाठी शेंडा पार्कात अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली. त्यानंतर आयसोलेशन आणि इचलकरंजीच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्येही (आयजीएम) प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या. या तिन्हीही ठिकाणी तपासणी केलेल्या स्वॅबचे अहवाल मिळण्यात सुरूवातील प्रचंड अडचणी येत होत्या. ग्रामीण भागातील व्यक्तीचे अहवाल त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले जात होते, तेथून संबंधितांना ते कळेपर्यंत अनेक प्रश्‍न निर्माण व्हायचे. त्यातून रूग्ण, त्याचे नातेवाईक यांचा डॉक्‍टरांशी वाद हा ठरलेला होता. पुर्वी अहवाल सीपीआरमधील बोर्डवर चिकटवले जायचे; पण आपल्या नातेवाईकांचे नाव शोधताना लोकांना त्रास होत होता. यातून नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. 

कोरोनाचा जिल्ह्यात प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून स्वॅब देण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा पत्ता, वय याबरोबरच त्यांचा मोबाईल क्रमांकही लिहून घेतला जात आहे. अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांना संबंधित विभागातील डॉक्‍टरांकडून त्याची माहिती दिली जायची. ही माहितीही उशीरा पोहचत असल्याने तोपर्यंत संबंधितांचा अनेकांशी संपर्क व्हायचा. त्यातून समुह संसर्ग झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. या सर्व कटकटी बंद करण्यासाठी "क्‍लाईव्ह पॅथालॉजी' या कंपनीमार्फत हे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. कालपासून हे तंत्रज्ञान कार्यान्वित झाले. यापुढे स्वॅब दिलेल्या संबंधितांना त्याचा अहवाल त्यांच्या मोबाईलवरच मिळणार आहे. 

दृष्टीक्षेपात अहवाल स्थिती 
येथे स्वॅब तपासणी - सीपीआर, शेंडा पार्क, आयजीएम-इचलकरंजी, आयसोलेशन हॉस्पिटल 
दररोज सरासरी होणारी तपासणी- 1300 ते 1500 स्वॅब 
आतापर्यंत तपासलेले स्वॅब - सुमारे 80 हजार 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT