coronavirus district collector permission required for entry Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात येणार असला तर, आधी ही बातमी वाचा; मगच निर्णय घ्या!

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : आपल्या जवळच्या नातेवाईकांना, ग्रामस्थांना कोरोनाचा प्रादूर्भाव होवू नये यासाठी, पुणे-मुंबईमधून येणाऱ्या लोकांनी जिल्ह्यात येण्यापूर्वी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घ्यावी. केवळ दक्षता म्हणून हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे केले.

कोल्हापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेली चार दिवस कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात पुण्यामुंबईसह इतर जिल्ह्यातील लोक आले. त्यामुळे त्यांची व्यवस्था करण्याचे नियोजन कोलमडले. अनेकांना स्वॉब घेण्यासाठी तासंतास रांगेत उभा रहावे लागले. क्वारंटाईन करण्यावर मर्यादा आल्या. केवळ पूर्व परवानगी न घेता आल्यामुळे हे सर्व घडले आहे. त्यामुळेच कोल्हापुरात येणाऱ्यांनी किमान दक्षता म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने यावे असे आवाहन आज पालकमंत्र्यांना करणे भाग पडले. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'गेली दोन महिने 40 लाख जिल्हावासियांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचं काम प्रशासनाने केलं आहे. एक मेपासून जिल्ह्यात पाच हजार गाड्या मुंबई-पुण्यातून आल्या आहेत. वैद्यकीय सारख्या कारणाने पास घेवून किमान पंधरा ते वीस हजार व्यक्ती आल्या आहेत. या सर्वांची स्व×ब तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वॅब घेण्यासाठी दोन दिवस आणि तपासणी अहवाल येण्यासाठी दोन दिवस लागतात. यापूर्वीच्या व्यक्तींचा अहवाल येईपर्यंत थोडेदिवस आपण थांबावे आणि गरज असेल तरच पुढचे चार-पाच दिवस यावे. जिल्ह्यात प्रादूर्भाव वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्याशी बोलून त्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. आपली राहण्याची व्यवस्था असेल तर जिल्ह्यात येण्याचे टाळावे. आपण जिल्ह्यात आल्यानंतर आपल्या घरच्यांना, ग्रामस्थांना भेटणार आहात. हा प्रादूर्भाव जवळच्या लोकांना होवू नये,अशी दक्षता आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT