Kirit Somaiya vs Hasan Mushrif esakal
कोल्हापूर

ED Inquiry : NCP आमदार हसन मुश्रीफांसह त्यांच्या मुलासमोरील अडचणी वाढल्या; कोर्टानं दिला 'हा' आदेश

न्यायालयाने नावेद यांना सहकार्य करण्याचे आदेश दिल्याने दोन दिवसात नविद ईडीच्या (Navid Mushrif) चौकशीसाठी जाण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

हसन मुश्रीफ यांनी लोकवर्गणीच्या नावाखाली कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप आहे.

कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याप्रकरणी सक्त वसुली संचानलायाने (ईडी) दाखल केलेल्या खटल्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे पुत्र व गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ हे सहकार्य करीत नसल्याची तक्रार इडीच्या वकिलांनी न्यायालयात केली.

याची दखल घेत न्यायालयाने नावेद यांना सहकार्य करण्याचे आदेश दिल्याने दोन दिवसात नविद ईडीच्या (Navid Mushrif) चौकशीसाठी जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, इडीने दाखल केलेल्या खटल्यापासून संरक्षण मिळावे म्हणून श्री. मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलाने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

त्याचा निकाल प्रलंबित असताना आज न्यायालयानेवरील आदेश दिल्याने श्री. मुश्रीफ व त्यांच्या मुलासमोरील अडचणी वाढल्या आहेत. हसन मुश्रीफ यांनी लोकवर्गणीच्या नावाखाली कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीवरून ईडी या प्रकरणाचा तपास करीत आहे.

यात नविद मुश्रीफ यांना यापूर्वीच ईडीने समन्स बजावले होते तरीही ते चौकशीला येत नाहीत, असा दावा आज इडीच्या वकीलांनी न्यायालयात केला. त्यावरून न्यायालयाने या प्रकरणीच्या तपासात नविद यांनी सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT