covid fighters art teacher positive story kolhapur 
कोल्हापूर

भय कोरोनाचे ; शाळा बंद मात्र कलाशिक्षकाचे समुपदेशनाचे काम सुरुच

बी. डी. चेचर

कोल्हापूर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणासाठी बाहेर पडत असतानाच फोन आला. ‘सर घरी यायला पाहिजे. तन्वी पॉझिटिव्ह आलीय’ असा पलीकडून आवाज. मग थेट त्यांचे घर गाठले. घरी बॅग भरून बेड मिळेल तिथे जाण्यासाठी सारी तयारी सुरू होती. सर्वच जण अस्वस्थ. मी बोलायला सुरवात केली. विविध अनुभव सर्वांशी शेअर केले आणि घरीच उपचार करण्याची सर्वांची मानसिक तयारी केली

घरच्यांनीही ते मान्य केले आणि पुढील उपचार सुरू झाले. मुळात सर्वांच्या मनातील कोरोनाबाबतची भीती दूर केली की पुढील साऱ्या गोष्टी सुकर होतात. याचा अनुभव पुन्हा आला....’’ कलाशिक्षक असणारे मिलिंद यादव सांगत होते. 


श्री. यादव शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये कलाशिक्षक. शाळा बंद आहेत. मात्र, शासनाने दिलेली विविध कामं रोज सुरू आहेत. त्याच्याही पुढे जाऊन कोरोनाच्या जंजाळातून लोकांना भयमुक्त करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. फोन येताच ते कुणाच्या घरी तर एखाद्या गल्लीतही जाऊन मोफत समुपदेशन करतात.    
श्री. यादव यांना तन्वीच्याच घरून त्यांना चार दिवसांनी पुन्हा फोन आला. या घरात एकूण नऊ लोक. यावेळीही श्री. यादव यांनी आपल्या खास शैलीत मुलाशी खेळत घरातील साऱ्यांना धीर दिला आणि त्याच्यावरही घरीच उपचार सुरू झाले आणि तोही कोरोनामुक्त झाला.

या घरातील सारी मंडळी आता कोरोनाबाबत भयमुक्त झाली आहेत आणि पुन्हा कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्याच्याशी घरीच थांबून दोन हात करण्याचा निर्धार त्यांनी पक्का केला आहे. त्यासाठी आवश्‍यक टीप्स श्री. यादव यांनी त्यांना दिल्या आहेत. श्री. यादव यांनी गेली काही दिवस हा उपक्रम मोफत सुरू केला आहे आणि त्यांच्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत. ते म्हणतात, ‘‘कोरोनाच्या भीतीपोटी माणूस निम्मा होतो. लोकांत अनेक गैरसमज आहेत. दीड महिना मी अनेकांशी जवळून संवाद साधतो आहे. लोकांना आवाहनही केले. मी कधीही यायला तयार आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळतो आहे आणि लोक कोरोनापासून भयमुक्त होत आहेत.’’

संपादन -  अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT