crime cases in kolhapur ichalkaranji three people punishment for crime
crime cases in kolhapur ichalkaranji three people punishment for crime 
कोल्हापूर

इचलकरंजी : रस्त्यात अडवून चोरी; तिघांना सुनावली शिक्षा

पंडित कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : सायझिंग कामगार सुरेश विष्णू गुरव याला रस्त्यात अडवून जबरी चोरी करणार्‍या तिघांना दोषी ठरवित येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रेडकर यांनी तीन वर्षे कारावास आणि प्रत्येकी 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. शुभम नितीन भोसले (वय 20 रा. कोरोची), रोहित गजानन जाधव (19, गणेशनगर) आणि सौरभ मकरध्वज माने (21, जयभिमनगर) अशी आरोपींची नांवे आहेत.

दरम्यान, या तिघांना यापूर्वी मोटरसायकल चोरी प्रकरणात प्रथमवर्ग न्यायालयाने तीन वर्षे सक्तमुजरी आणि प्रत्येकी 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. तर त्यांच्यावर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हाही दाखल असून सध्या ते करागृहात आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, 26 नोव्हेंबर 2019 रोजी एैन दिवाळी दिवशी अल्पवयीन बालिकेचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यामध्ये रोहित जाधव, सौरभ माने, शुभम भोसले या तिघांचा समावेश होता. 

बालिकेच्या अपहरणापूर्वी या तिघांनी पहाटेच्या सुमारास राधाकृष्ण चौकातील संजीवनी हॉस्पिटलजवळ सुरेश गुरव या सायझिंग कामगाराला रस्त्यात अडवून त्याच्याकडील बोनसची 21 हजार रुपयांची रक्कम व मोबाईल हिसकावून घेतला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी जाधव, माने व भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करुन न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिघांना न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेऊन अटक केली होती.

या प्रकरणाचा तपास पोलिस निरिक्षक भागवत मुळीक यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर सुनावणी होऊन न्यायालयाने तिघांना दोषी ठरवित तीन वर्षे कारावास व प्रत्येकी 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सौ. आर. आर. डावाळे यांनी काम पाहिले.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT