dead person in a mine near kolhapur Rankala Lake
dead person in a mine near kolhapur Rankala Lake 
कोल्हापूर

रंकाळा तलावाजवळील खाणीत मृत बगळा 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या पिछाडीस असलेल्या खाणीत पुन्हा एकदा बदकाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांनी सायंकाळी मृत बदक ताब्यात घेतले. 
इराणीखाणी लगत अन्य दोन नैसर्गिक खाणी आहेत. पत्तौडी खाण तसेच खणविहार मित्र मंडळाची खाण आहे. परिसरात बदकांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. सकाळी फिरायला येणारे लोक बदकांना खाद्यपदार्थ टाकतात. अनेक वर्षांपासून बदके रंकाळा परिसराच्या सौंदर्यात भर घालत आहेत. आज सायंकाळी आदित्य होरड यांना तलावात बदक मृत झाल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ पालिकेशी संपर्क साधून त्याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी बदकाला ताब्यात घेतले. 

काही दिवसांपूर्वी शाहू स्मृती उद्यानासमोरील रंकाळा तलावात दोन पाणबदकांचा मृत्यू झाला होता. लगतच्या सरनाईक कॉलनीत कबुतराचा मृत्यू झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेत रंकाळा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून जाहीर केले होते. तसेच मृत बदके औंध येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यानंतर त्यांचा मृत्यू कुरकुरे व चिप्स खाल्ल्याने झाल्याचा अहवाल आला होता.

थंडीमुळे स्थलांतरीत पक्षी मोठ्या प्रमाणावर रंकाळा तलावावर दाखल झाले आहेत. बर्ड फल्यूच्या धास्तीमुळे पक्ष्यांच्या जवळ जाण्यास कोणी तयार होत नसल्याची स्थिती आहे. त्यात आज बदकाचा मृत्यू झाल्याने अधिक सतर्क राहण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

  
संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT