कोल्हापूर : अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग २ भरण्याची मुदत आज संपली. १२,८९८ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. १४,४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १,५३५ विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग भरलेला नाही. गुणानुक्रमे महाविद्यालयांची प्रवेश यादी शनिवारी (ता.५) जाहीर होणार आहे. त्यानंतर प्रवेश घेणे सुरू होईल.
अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली. अर्ज भरण्यापासून ते सर्व कागदपत्रे जोडणे, प्रवेश शुल्क हे सर्व यंदा ऑनलाईन होते. यंदा दहावीचा निकालाची टक्केवारी अधिक असल्याने यंदा कटाउट जास्त लागणार हे निश्चित असल्याने विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये प्रवेश प्रक्रियेबद्दल उत्सुकता आहे.
अर्ज भरण्याचा पहिला भाग १४ हजार ४३३ जणांनी भरला. त्यापैकी १ हजार ५३५ विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग भरला नाही. १२ हजार ८९८ विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित करण्यात आले. विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल सर्वाधिक आहे. ६,९१४ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेसाठी अर्ज केले आहेत. अर्जची गुणप्राधान्य क्रमाने छाननी होऊन शनिवारी (ता.५) महाविद्यालयांची कटऑफ लिस्ट लागणार आहे. त्यानंतर प्रवेश निश्चिती केली जाईल.
शाखानिहाय अर्ज
कला शाखा (इंग्रजी माध्यम) - ८३
कला शाखा (मराठी माध्यम) - १७०४
वाणिज्य शाखा (मराठी माध्यम) - २३६१
वाणिज्य शाखा (इंग्रजी माध्यम) - १८३६
विज्ञान शाखा - ६९१४
एकूण - १२,८९८
शाखानिहाय जागा
कला शाखा (इंग्रजी माध्यम) - १२०
कला (मराठी माध्यम) - ३६००
वाणिज्य (मराठी माध्यम) - ३३६०
वाणिज्य (इंग्रजी माध्यम) - १६००
विज्ञान - ६०००
एकूण - १४,६८०
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.