the decision of government related with teachers recruitment is not beneficial for non grant teachers due to age limit in belgaum 
कोल्हापूर

सरकारच्या निर्णयामुळे 167 शिक्षकांचे भवितव्य अधांतरी

मिलिंद देसाई

बेळगाव : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील विविध अनुदानित शाळांमध्ये विनाअनुदानित काम करणाऱ्या 40 ते 45 वयोगटातील शिक्षकांना यावर्षीच सेवेत कायम करुन घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा जिल्ह्यातील 167 शिक्षकांना अनेक वर्षे नोकरी करुनही वयोमर्यादेमुळे मोठा फटका बसणार आहे. 
कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सरकारने यावर्षी कोणत्याही प्रकारची नवीन भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विविध सरकारी कार्यालयांसह शिक्षक भरतीलाही मार्च 2021 पर्यंत ब्रेक लागला आहे. 

मात्र याचा सर्वाधिक फटका अनुदानित शाळांमध्ये अनेक वर्षांपासुन करणाऱ्या शिक्षकांना बसणार आहे. अनुदानित शाळांमध्ये कायमस्वरुपी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या बेळगाव जिल्हातील अनेक शिक्षकांची मयोमर्यादा संपत आली आहे. शिक्षक भरतीसाठी सामान्य वर्गासाठी 40, ओबिसी 42 तर मागासवर्गीयांसाठी 45 अशी वयोमर्यादा आहे. जिल्ह्यातील 167 शिक्षकांची वयोमर्यादा यावेळी संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यावर्षीच शिक्षक भरती होणे आवश्‍यक आहे. अन्यथा पंधरा ते विस वर्षे काम करुन देखिल शिक्षकांना नोकरीवर पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. 

भाषिक अल्पसंख्याकांच्या शाळांना रोष्टर पध्दत लागु करण्यात आल्यामुळे शिक्षक भरती झालेली नाही. त्याचा फटकाही विनाअनुदानित शिक्षकांन बसला आहे. काही महिन्यांपुर्वी रोष्टर हटविण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र त्याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल करण्यात आलेली नाही त्यामुळे नाराजी व्यक्‍त होत आहे. तसेच सरकारच्या भुमिकेमुळे काही अनुदानित शाळांमध्ये फक्त एक दोनच शिक्षक कायमस्वरूपी असून बाकीच्या शिक्षकांना संस्थेतर्फे मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

"बेळगाव जिल्ह्यातील 167 शिक्षकांची वयोमर्यादा यावर्षी संपत असल्याची बाब शिक्षण खात्याच्या निर्दशनास आणुन देण्यात आली होती. शिक्षकांना यावर्षी सेवेत रुजु करुन घेऊन पुढील वर्षी पगार दिला तरी चालेल अशी मागणीही करण्यात आली आहे. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाही."

- एकनाथ पाटील, अध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघटना

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT