Collector Rahul Rekhawar vs Maratha community  esakal
कोल्हापूर

Kolhapur : 'मराठ्यांशी दुश्मनी करणाऱ्या त्या अधिकाऱ्याच्या छाताडावर नाचू'; मराठा संघटना-जिल्हाधिकाऱ्यांत जोरदार खडाजंगी

त्या अधिकाऱ्याला कोल्हापूरमध्येच नव्हे तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही - संजय पवार

सकाळ डिजिटल टीम

'मराठा समाजाच्या ज्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली ती गोपनीय बैठक होती. त्या बैठकीत काय झाले हे सांगण्याचा मला अधिकार नाही.'

कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अॅन्टी चेंबरमध्ये घेतलेल्या बैठकीत एका अधिकाऱ्याने आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांना जाब विचारला.

तर, या बैठकीत आपण किंवा इतरांनी असे कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही, याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनाही विचारु शकता, असा खुलासा जिल्हाधिकारी रेखावार यांनी केला. दरम्यान, एकमेकांचे ऐकून घेण्यावरुन ॲड. बाबा इंदुलकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यात शाब्दिक वाद झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत एका अधिकाऱ्याने वादग्रस्त विधान केले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात काल सकल मराठा समाजासोबत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एका अधिकाऱ्याने ‘मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण लागू केले तर राज्याच्या काही सीमावर्ती भागात दंगली होतील’ असे विधान केल्याचा आरोप या बैठकीत असणाऱ्या योगेश केदार यांनी केला होता.

तर, ज्या अधिकाऱ्याने वादग्रस्त विधान केले आहे, त्याची चौकशी करुन त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली. दरम्यान, मराठा समाजाच्या त्या बैठकीत जे काही घडले हे उपमुख्यमंत्र्यांनाच विचारले पाहिजे होते. इतर कोणी काहीही म्हणत असेल तर त्यावर विश्‍वास ठेवणे योग्य नाही. मग तो वकील असला तरीही, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

यावर, ॲड. बाबा इंदुलकर यांनी तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून ज्या गोष्टी सांगता त्या गोष्टीवर आम्ही विश्‍वास ठेवावा हे सुध्दा योग्य नाही. यावर सुरुवातीपासून तुमचे शांतपणे ऐकत असताना तुम्ही आवाज वाढवून बोलण्याची गरज नाही, असे जिल्हाधिकारी सांगत असतानाच रेखावार आणि ॲड. इंदुलकर यांच्यात शाब्दिक वाद झाला.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ‘मराठा आरक्षणासाठी सनदीशीर मार्गाने लढा दिला जात आहे. यामध्ये कोणताही शासकीय अधिकारी खोडा घालत असेल तर त्या अधिकाऱ्याला कोल्हापूरमध्येच नव्हे तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही.’ जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, ‘मराठा समाजाच्या ज्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली ती गोपनीय बैठक होती. त्या बैठकीत काय झाले हे सांगण्याचा मला अधिकार नाही. याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी माहिती दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी बोलले तर गोपनीयतेचा भंग होतो.

तसेच, जे सदस्य त्या बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीत झालेली चर्चा बाहेर सांगायची नसते हा शासकीय अलिखित नियम आहे. त्याचा त्यांनी भंग केला आहे. या बैठकीत जाणीवपूर्वक गोंधळ घडवून आणला का? याची चौकशी सुरु केली आहे.’

दरम्यान, ‘या बैठकीत मी किंवा इतर अधिकाऱ्यांनी कोणतेही आक्षेर्पाह विधान केलेले नाही. यावर कोणीही विश्‍वास ठेवू नये,’ असा लेखी खुलासाही रेखावार यांनी केला आहे. यावेळी बाबा पार्टे, रुपाराणी निकम, राजू लिंग्रस, विजय देसाई, कमलाकर जगदाळे, संगिता खाडे, दत्तात्रय टिपुगडे, विशाल देवकुळे, अवधूत साळोखे आदी उपस्थित होते.

मराठा समाजाची ताकद दाखवू

दिलीप देसाई म्हणाले, ‘योगेश केदार हे या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी याबद्दल फेसबुकवर जिल्हाधिकारी म्हणून नाव घेवून अशी पोस्ट केल्याचे प्रसिध्द केले आहे. त्यामुळे मराठा समाजात नाराजी व्यक्त केली जात आहे.’ शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, ‘जो कोणीही मराठा समाजाच्या आरक्षणावर उठला असेल तर त्याच्या छातीवर बसून त्याला मराठा समाजाची ताकद दाखवून दिली जाईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer : संघाच्या पथसंचलनात सहभागी झालेल्या आणखी एका सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई; वैद्यकीय अधिकाऱ्याला केलं निलंबित

Kolhapur Jaggery : दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त! कोल्हापुरात गुळाचे सौदे सुरू, एका क्विंटलला उच्चांकी दर

Laadki Bahin Yojana : भाऊबीजेला मिळणार लाडक्या बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता? एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : बलिप्रतिपदेच्या दिवशीची अनोखी परंपरा, गुराख्याच्या अंगावरून चालतो गायींचा कळप

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं! सोहमची पूजाच्या फोटोंवर खास कमेंट, व्यक्त केलं मनातलं प्रेम

SCROLL FOR NEXT