Doctors do not touch patients without payment
Doctors do not touch patients without payment 
कोल्हापूर

धक्कादायक प्रकार समोर ; तरच डाॅक्टर रूग्णांना हात लावतात अन्यथा...

सुनील पाटील

कोल्हापूर : एक लाख रुपये अनामत आणि पन्नास हजार औषधांचे भरल्याशिवाय कोणत्याही आजाराच्या रुग्णाला आता खासगी दवाखान्यात दाखल करून घेतले जात नाही. पैसे भरल्याशिवाय डॉक्‍टरांकडून हातही लावला जात नाही. जिल्ह्यातील नामवंत दवाखान्यातील हा प्रकार रुग्णांचे मानसिकतेचे खच्चीकरण करत आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. कोरोनाचा असो किंवा इतर कोणत्या आजाराचा रुग्ण असो, त्याला बेड नाहीत म्हणूनच सुरुवात केली जाते. यातूनही बेड मिळाला तर पहिल्यांदा लाख रुपये अनामत व 50 हजार औषधांचे भरण्याचे फर्मान काढले जाते. ही रक्कम रुपयाही कमी न करता भरणाऱ्यांना तात्काळ ऍडमिट करून घेतले जाते. ताप, थंडी किंवा इतर आजारांचा रुग्ण असला तरी त्याला कोरोनाच झाला असेल म्हणून संशयाने पाहिले जाते. रुग्णासमोरच तुम्हाला कोरोनाची तपासणी करावी लागेल म्हणून सांगितले जाते. तपासणी करण्यासही हरकत नाही; मात्र दवाखान्यात आलेल्या रुग्णाला दिलासा देण्याआधी किंवा ऍडमिट करण्याआधीच विविध नियम अटी आणि डिपॉझिट भरण्यास सांगितले जात आहे. रुग्णाच्या काळजीने भेदरलेल्या नातेवाईकांना काहीही करून पैशाची जुळवा-जुळव करून पैसे भरावे लागतात. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात होते. कोरोना पॉझिटिव्ह आला तर गरोगरीबाने सर्व काही विकून पैशांची व्यवस्था करावी लागते. हे वास्तव अनेकजण उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. 

वडिलांना शहरातील एका दवाखान्यात ऍडमिट करण्यास आणले होते. तेथे दीड लाख भरण्यास सांगितले होते. त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. ताप, खोकला आणि धाप होती; पण त्यांनी ठरावीक किमतीचे पॅकेज सांगितले. एक दिवसाचा दर ही सांगितला. त्याआधी दीड लाख रुपये भरल्याशिवाय ऍडमिट करून घेतले नाही. 
- संजय शिरटे, रुग्णांचे नातेवाईक 

 संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT