domestic gas cylinder spot in kadamwadi kolhapur area two sister are injured in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर : घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटात दोन महिला जखमी

राजेश मोरे

कोल्हापूर : कदमवाडीत आज सकाळी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात घराची भिंत कोसळून दोन महिला जखमी झाल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली. घटनास्थळी अग्निशामक दलाने धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली.जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. 

याबाबत अग्निशामक दलाने दिलेली माहिती, कदमवाडी विठ्ठल मंदिर गल्लीत धनाजी पाटील यांचे घर आहे. त्यांच्याकडे चौगुले कुटुंब भाडेकरू म्हणून राहते. या घरातील गॅस सिलिंडरला गळती लागली. सकाळी सहाच्या सुमारास अचानक स्फोट झाला. यात घराची चौकट, खिडकीसह भिंतीचा काही भाग कोसळला. त्यात भाडेकरू विजया चौगुले (वय 50) व उषा चौगुले (वय 55) या दोघी बहिणी किरकोळ भाजून जखमी झाल्या. स्फोटामुळे परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी दोघी बहिणींना बाहेर काढले. दरम्यान घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. 
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT