Drone capture Gamblers Ten Action Against Ten kolhapur marathi news 
कोल्हापूर

ब्रेकिंग - इचलकरंजीत ड्रोनने टिपले जुगार खेळणाऱ्यांना : दहाजणावर झाली कारवाई

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरीकांची गर्दी टाळण्यासाठी पोलिस यंत्रणेने ड्रोन कॅमेराचा वापर सुरू केला आहे. त्याचा पहिला दणका जुगार खेळणाऱ्या दहा जणांना बसला आहे. सम्राट अशोकनगर परिसरात असलेल्या पालिका शाळेच्या मोकळ्या जागेत हे सर्वजण तीन पानी जुगार खेळत बसले होते. ड्रोन कॅमेऱ्याची त्यांच्यावर नजर पडली. त्यानंतर गावभाग पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.

ड्रोनच्या माध्यमातून प्रथमच कारवाई​
या कारवाईत चार मोबाईल सह एकूण ३७०० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. ड्रोनच्या माध्यमातून इचलकरंजीत अशा प्रकारे प्रथमच कारवाई करण्यात आली आहे.
कारवाई करण्यात आलेल्यांची नावे अशी, संजय वसंत आवळे (वय ५२,  रा.नेहरूनगर), चंद्रकांत वसंत हावळ (४६), अक्षय शशिकांत आयवळे (२३), विश्वास मधुकर आवळे (२८), परशूराम रामचंद्र कोरवी ( ४०, शिक्षक कॉलनी रोड), श्रीरंग आण्णा मोहिते (५९, गणेशनगर), संजय रघुनाथ कामते (३०, अशोकनगर), राजू गणपती केंगार (४२, कोरवी गल्ली), रमेश अशोक कांबळे (३३, नेहरूनगर), शहानूर दस्तगीर जमादार (३१, नेहरूनगर).
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी इचलकरंजीत लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

सर्व जुगाऱ्यावर गुन्हा नोंद ​

मात्र त्यानंतरही अनेक ठिकाणी नागरीक विनाकारण एकत्र येवून गर्दी करीत आहेत. सर्वच ठिकाणी नागरीकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे गर्दीची माहिती मिळविण्यासाठी ड्रोन कॅमेरा वारण्यात येत आहे. या ड्रोन कॅमेऱ्यातून जुगार खेळत असल्याचे पोलीस यंत्रणेला दिसून आले. त्यानंतर या ठिकाणी धाड टाकून हि कारवाई करण्यात आली.  या सर्व जुगाऱ्यावर गवभाग  पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT