even odd date option for shops in kolhapur ichalkaranji 
कोल्हापूर

इचलकरंजीत नवी नियमावली;  दुकानांसाठी सम -विषम तारखेचा पर्याय

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - लॉकडाऊन शिथील केल्यानंतर शासनाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करीत शहरातील बहुतांशी दुकाने सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर पालिकेने दुकाने सुरु ठेवण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये कोणती दुकाने सुरु ठेवायची व कोणती बंद ठेवायची, याचे स्पष्टीकरण दिले आहे. तर संभाव्य गर्दी टाळण्यासाठी दुकाने सुरु करण्यासाठी सम-विषम तारखेचा पर्याय पालिका प्रशासनाने जाहीर केला आहे.


सम - विषय तारखेचा पर्याय असा
सम तारखेला पश्‍चीम व उत्तर दिशेला तोंड असलेली दुकाने सुरु ठेवता येणार आहेत. तर विषम तारखेला पूर्वेकडे व दक्षिणेकडे तोंड असलेली दुकाने सुरु ठेवता येणार आहेत. या ठिकाणी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सींगचा वापर करणे, पाच पेक्षा जास्त लोकांची गर्दी होवू न देणे, दुकान निर्जंतुकीकरण करणे, लहान मुले व वृध्दांना दुकानात येवू न देणे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.


पालिकेचे स्पष्टीकरण

शासन निर्णयानुसार एकाकी दुकाने, रहिवाशी भागातील व रहिवाशी संकुलातील दुकाने सुरु ठेवता येणार आहेत. पण मॉल, व्यापारी संकुलातील सर्व दुकाने सुरु करता येणार नाहीत, असे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे.


“पालिकेने केलेल्या सूचनांचे पालन न केल्यास संबंधित दुकान मालकांवर व नियमांचे उल्लंघन केलेल्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच संबंधित दुकान सीलबंद केले जाणार आहे.

-दीपक पाटील, मुख्याधिकारी

कोल्हापुरातील घटना घडामोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election : गोंधळच गोंधळ! नांदेडमध्ये मतदारांना कोंडलं, अंबरनाथला बोगस मतदार आणले, तर कोपरगावात उमेदवारांमध्ये बाचाबाची

Mumbai: ठाणे-सीएसएमटी प्रवास होणार सोपा! सायन उड्डाणपुलाला समांतर दोन पदरी पूल बांधणार; नवीन मार्ग कसा असणार?

Maharashtra Govt Scheme: आनंदी बातमी! या जोडप्यांना महाराष्ट्र सरकारकडून मिळणार 1.5–2.5 लाख रुपये; अर्ज कसा करावा ते जाणून घ्या

Girish Mahajan : 'हरित नाशिक'साठी ५० हजार वृक्षांचा संकल्प; मंत्री गिरीश महाजन यांची 'होमेथॉन'ला भेट

तळोजा जेल परिसरात बिबट्याचा वावर? व्हायरल व्हिडिओचं सत्य समोर; वन विभागानं नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT