Fifteen hundred types of attacks for protection against women 
कोल्हापूर

महिलांनो हे टेक्‍निक शिका ; सवरक्षणासाठी "अटॅक'चे पंधराशे प्रकार 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - मुलींनी आत्मनिर्भर होण्यासाठी स्वसंरक्षणाची टेक्‍निक शिकवण्याची जबाबदारी वुमेन सेल्फ डिफेन्स ग्रुप पेलत आहे. ग्रुपचे सतिश वडणगेकर यांनी आजवर विविध वयोगटातील 15 हजार तरूणींना लढवय्या होण्यासाठी तंत्र शिकवले आहे. स्वतःचा बचाव करण्यासह "अटॅक'चे सुमारे पंधराशे प्रकारांचे प्रशिक्षण त्यांच्याकडून शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी घेतले आहे. आव्हानात्मक परिस्थितीत छोट्याशा टेक्‍निकमधून स्वसंरक्षणाचा धडाच यामाध्यमातून ते देत आहेत. 

वुशु असोसिएशन ऑफ कोल्हापूर, इंडियन मार्शल आर्ट थांगता असोसिएशन अंतर्गत वूमन सेल्फ डिफेन्स व वूमन सोशल आर्मी ग्रुप यांच्या माध्यमातून तरूणींना हे प्रशिक्षण दिले जात आहे. 1997 -98 दरम्यान मुलींना कराटेचे प्रशिक्षण देणे सुरू केले. दरम्यानच्या काळात मार्शल आर्टचा त्यांनी सखोलपणे अभ्यास केला. मार्शल आर्टमधील साधारणतः 750 हून अधिक पुस्तकांचे वाचन केले. यातील संरक्षण व अटॅकची विविध टेक्‍निक्‍स आत्मसात केली. न्यू मिडीयम स्कूल, मुरगूड, रॉयल इंग्लिश स्कूल, उचगाव आणि वि. स. खांडेकर प्रशाला, शाहुपूरी या शाळांमधील विद्यार्थिनींना याचे प्रशिक्षण दिले. 

घरात झाडु मारताना, फरशी पुसताना, कपडे धुताना, स्वयंपाक करताना, गाडीला किक मारताना तसेच गाडी चालविताना होणाऱ्या सहज हालचालींचा वापर स्वसंरक्षणासाठी कसा होतो. याचे बारकावे विद्यार्थिनींना देण्यास सुरवात केली. ते देत असलेल्या या प्रशिक्षण शिबीराला मागणी वाढत गेली. महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा येथेही तरूणी, महिलांसाठी ही शिबीरे घेण्यात आली. तरूणी, महिलांना हे प्रशिक्षण देण्यासाठी 25 तरूणींचा संघ त्यांनी तयार केला. उत्तमरित्या प्रशिक्षण देणाऱ्या महिला प्रशिक्षकांना शिष्यवृत्तीही दिली जाते. 

शारिरीक संरक्षणासोबतच मनाला उभारीही 
सार्वजनिक ठिकाणी किंवा बस, वडापमध्ये चोरटे स्पर्श, छुप्या छेडछाडीचा सामना करावा लागतो. अशा वेळी भितीपोटी महिला, तरूणी प्रतिकार करत नाहीत. स्वसंरक्षणासोबतच आत्मविश्‍वासाने प्रतिकार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, याकरिताही शिबीरात मार्गदर्शन केले जाते. 

वयोगटानूसार प्रशिक्षण 
विविध वयोगटातील महिलांवर होणाऱ्या अतिप्रंसगाना मात कशी करायची याचेही मार्गदर्शन या शिबीरातून केले जाते. पाच ते चौदा वयोगटातील मुलींना गुड टच, बॅड टचची माहिती देऊन स्वसंरक्षणाचे टेक्‍निक्‍स दिले जातात. तर 15 ते 25 वयोगटातील तरूणींना स्वसंरक्षणाच्या विविध पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाते. 

तुमच्याकडे कोणतेही शस्त्र, साहित्य नसतानाही विविध टेक्‍निक्‍स वापरून स्वसंरक्षण करू शकता. ही बाब तरूणी, महिलांना समजावी. त्या टेक्‍निक्‍स त्यांना समजाव्यात यासाठी स्वसंरक्षण शिबीरे घेतो. मोफत देणाऱ्या या प्रशिक्षणातून हजारो महिला, मुलींचा प्रतिसाद लाभतो आहे. 
- सतिश वडणगेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahabuddin Razvi : 'कोणत्याही मुस्लिम संघटनेने मुले जन्माला घालू नका असं म्हटलेलं नाही'; मौलाना रझवींचा कोणावर निशाणा?

Electric Shock Accident: विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू; परभणीतील पालममधील घटनेत तिघे गंभीर जखमी

Latest Marathi News Updates : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार, 10 वाजता 14 हजार क्युसेक पाणी सोडणार

World Boxing Championships 2025: जास्मिन, मीनाक्षीचा सुवर्ण पंच; जागतिक बॉक्सिंग स्पर्धा, नुपूरला रौप्य अन्‌ पूजाला ब्राँझपदक

Hong Kong Open Badminton 2025: सात्विक-चिराग जोडीसह लक्ष्यने संधी गमावली; हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धा, भारतीय खेळाडू उपविजेते

SCROLL FOR NEXT