fight in coronairas suspected that these two brothers in Kolhapur marathi news 
कोल्हापूर

कोरोनाच्या लढ्याासाठी कोल्हापूरच्या या दोन भावांनी लढवली अशी शक्कल....

अमोल सावंत

 कोल्हापूर  : कोविड-19 च्या विरोधात यशस्वीपणे लढण्यासाठी शिवाजी उद्यमनगरमधील विजय फॅब्रिकेटर्स कारखान्यात सॅनिटायझर डोमची निर्मिती करण्यास सुरवात झाली. विशेष म्हणजे, हा सॅनिटायझर ड्रोन दोन दिवसात तयार करता येतो. कोविड-19 पासून संरक्षण कवच मिळण्यासाठी आज मास्क, सॅनिटायझर, स्पिरिटस्‌, इथिल अल्कोहोल, हायड्रोजन पेरॉक्‍सॉईडची द्रावणे, विविध प्रकारची औषधे/गोळ्या घेणे, काळजी घेणे, क्वारंटाईन, घरात थांबणे असे नियम पाळून काळजी घेतली जात आहे; मात्र जे लोक प्रत्यक्ष काम करत आहेत, अशांसाठी हा सॅनिटाझर ड्रोन तयार केला. 

हा डोम कोणत्याही कॉलनी, गल्लीच्या समोर, राज्य आणि केंद्र सरकारी कार्यालये, महापालिका, शाळा, महाविद्यालये, खासगी संस्था, कॉर्पोरेट कार्यालये, कंपन्यांची ऑफिसेस, विविध छोटे-मोठे उद्योगांमध्ये वापरता येतो. जेणेकरुन या डोम मधून जाताना सॅनिटाझर संपूर्ण शरिरावर पसरते. असे काही डोम पुणे, मुंबईमधील काही पोलिस ठाण्यासमोर, काही कार्यालयासमोर उभे केले आहेत. डोमच्या बाजूला सॅनिटाझर असलेली बादली, छोटा टॅंकमधून सॅनिटायझर स्प्रे होतो.

असा बनवला जातो डोम

याबाबत फॅब्रिकेटर्सचे प्रशांत जाधव म्हणाले, ""या डोमची निर्मिती ही दोन दिवसात तयार करता येते. यासाठी डोमची फ्रेम तयार करताना आम्ही मोटर, पीव्हीसी पाईप, जीआय पाई, पार्टीशन पॅराशूट वॉटरप्रुफ कापड वापरले आहे. जेव्हा एखादी व्यक्ति या डोममधून बाहेर पडते. तेव्हा सॅनिटायझर स्प्रे करण्यासाठी डोम च्या खालील बाजूस स्वीच ठेवला आहे. हा स्वीच पायाने दाबला की, सॅनिटायझर स्प्रे होते. संपूर्ण शरिरावर हा स्प्रे पसरतो. एक मिनिटात संपूर्ण शरिर सॅनिटाईझ होते.'' 

हा डोमची अडीच मीटर उंची असून दिड मिटर रुंदी आहे. यामुळे उंच व्यक्तिसुद्धा यातून पूर्णपणे सॅनिटाईझ होते. हा डोमकुठेह उभा करता येतो. खरेतर हा डोम पुढील काळात ही उपयोगाला येणार आहे. वजन हलके असल्याने हा डोम रिक्षा, टु व्हिलरवरुन नेता येतो. कदमवाडी येथील नगरसेवक वैभव माने यांना हा डोम डेमोसाठी दिला जाणार आहे. असे डोम एका दिवसात चार ते पाच तयार करता येतात. जिल्ह्याची लोकसंख्या पाहिली तर असे सॅनिटायझर डोम खूप लागतील. श्री. जाधव म्हणाले, ""कुणी हा डोम करण्यासाठी ऑर्डर दिली तर आम्ही तो तातडीने उपलब्ध करुन देऊ.'' 

येथे मिऴेल डोम

ज्यांना हा डोम आपल्या कॉलनी, गल्लीमध्ये बसवायचा आहे, त्यांनी विजय फॅब्रिकेटर्सशी संपर्क साधावा. या डोम मध्ये वापरले जाणारे सॅनिटायझरचे द्रावण हे शासन मान्यताप्राप्त असावे. आज लॉकडाऊनमुळे उद्यमनगरमध्ये छोटे उद्योग, व्यवसाय बंद असले तरी अत्यावश्‍यक सेवा उपलब्ध करुन दिल्या तर छोट्या उद्योजकांच्या अर्थकारणाला गती येते. विजय फॅब्रिकेटर्सने हे दाखवून दिले आहे. प्रशांत जाधव, सागर जाधव हे उद्यमनगरमधील जयशिवराय मित्र मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. 

""अशा डोमच्या निर्मितीसाठी 30 ते 40 हजार रुपये खर्च येतो; पण आम्ही सर्वसामान्यांसाठी हा डोम 12 हजार रुपयामध्ये उपलब्ध करुन दिला आहे. कोविड-19 ला हरविण्यासाठी अशी लढाई आम्ही डोमच्या माध्यमातून करत आहोत. लोक निश्‍चितपणे हा ड्रोन स्वीकारतील. स्वत:चे कोविड-19 पासून संरक्षण करतील.'' 
- सागर जाधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT