crime sakal
कोल्हापूर

व्यापारी निलेश पटेल याच्यावर गुन्हा दाखल करावा; शिवसेनेतर्फे मागणी

शिवसेनेतर्फे बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डमधील मुख्य कार्यालयावर आज धडक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा वापरणाऱ्या व्यापारी निलेश पटेल याच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डमधील मुख्य कार्यालयावर आज धडक देण्यात आली. कर्नाटकातील गुळाची आवक बंद करा, असे सांगत पटेल याचा परवाना रद्द करण्याची आग्रही भूमिका मांडण्यात आली. त्याच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत त्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान, बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाचे अध्यक्ष जयवंत पाटील यांनी पटेल याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही दिली. (file case against Nilesh Patel Demand from Shiv Sena)

या वेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, "गूळ तपासणीसाठी नेमलेले सदस्य काय करतात? कर्नाटकातून गुळ येतोच कसा? राजर्षी छत्रपती शाहू महाराज ब्रँडने तो गूळ विकला जातो, हे दुर्देव आहे. हा अवमान खपवून घेतला जाणार नाही. यासाठी कारणीभूत झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? बंदुकीची भाषा करणाऱ्या पटेलची धमकी खपवून घेतली जाणार नाही. त्याला शिवसेनेच्या ताब्यात द्या. तसेच कर्नाटकातून होणारी गुळाची आवक थांबवा."

तानाजी आंग्रे म्हणाले, "जिल्ह्यातील गु-हाळघरांची संख्या १२०० वरून ३०० झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत वाईट अवस्थेत जगत आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असून, मूठभर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बदनाम केली आहे." प्रा. जालंदर पाटील म्हणाले, "समितीच्या संचालकपदी काम करण्याची संधी मिळाल्यानंतर तीन कार्यक्रमांसाठी एक कोटी रुपये खर्च होत असल्याचे लक्षात आले. तो तातडीने बंद केला. बैठकीसाठी असणाऱ्या भत्त्याला हात लावलेला नाही. राजर्षी शाहू गूळ जीआय मानांकनाचा व्हावा, यासाठी प्रयत्न करायला हवेत. गुळाला हमीभाव मिळण्यासाठी आता संघर्ष करुया."(Kolhapur News)

शिष्टमंडळात विजय देवणे, सुजित चव्हाण, अशोक डवंग, विवेक काटकर, राजू यादव, भारत भापकर, सरदार पोवार, प्रशांत नाळे, जालिंदर माने, कृष्णात पोवार, विनोद खोत, राजू यादव, विराज पाटील, विठ्ठल कोळेकर, पोपट दांगट, सरदार तिप्पे, भारत खोत, अनिल पाटील, बाळासाहेब नलवडे, जयराम पोवार, सुजित चव्हाण, मंजित माने, शिवाजी जाधव, राजू जाधव, दीपक पोपटांनी, दिलीप देसाई, रणजित आयरेकर, संजय जाधव यांचा समावेश होता.

राजर्षी छत्रपती शाहू ब्रँडच्या नावाखाली कर्नाटकचा गूळ विकला जातो, असे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितल्यानंतर कर्नाटकातील गूळ मार्केट यार्डात अजून कोणाकडे आहे का, याची तपासणी केली जाईल, असे आश्वासन जयवंत पाटील यांनी दिले.(Market Yard)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SCROLL FOR NEXT