firing between police and gangster kolhapur marathi news 
कोल्हापूर

साहेब, चित्रपटापेक्षाही भयानक परिस्थिती होती... कोल्हापूर एन्काउंटरचा असा थरार....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - किणी टोल नाक्‍यावर रात्री साडेनऊच्या दरम्यान अचानक पोलिसांचा गराडा. काही समजण्यापूर्वीच चित्रपटातील खलनायकाने नायकावर हल्ला करावा आणि त्यातून नायकाने प्रतिहल्ला करून खलनायकाला जेरबंद करावे, असा थरार प्रत्यक्ष पाहताना कर्मचाऱ्यांसह उपस्थितांचा अक्षरशः थरकाप उडाला. साहेब, चित्रपटापेक्षाही भयानक परिस्थिती होती, असे भेदरलेल्या अवस्थेतच कर्मचारी बोलत होते.

पाहताक्षणी मोटार डिव्हायडरवर धडकली

रात्री साडेनऊच्या दरम्यान टोल नाक्‍यावर नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी कमी होऊ लागली होती. बंगळूरकडून एका मोटरीतून गुन्हेगार किणी पथकर नाक्‍यावरून राजस्थानकडे जाणार असल्याची माहिती समजताच पोलिस नाक्‍यावर दाखल झाले. त्यांनी राजस्थान पासिंगच्या गाडीचा शोध सुरू केला. एखाद्या तस्कराचा शोध सुरू असावा, असे पाहणाऱ्यांना वाटत होते. आरं काय झालंय, अशी एकमेकांना विचारणा सुरू होताच बंदुकीतून फायरिंगचा आवाज सुरू झाला. पाहताक्षणी मोटार डिव्हायडरवर धडकली होती. पोलिस बचाव करीत खाली पडले. गाडीतून होणारे फायरिंग कमी होताच क्षणाचा विलंब न करता पोलिसांनीही बचावासाठी फायरिंग केले आणि यात दोघे जखमी झाले. एकाला पकडले. हा थरार दहा मिनिटे सुरू होता. आपण पाहतोय हे निश्‍चित बरोबर आहे का आपण स्वप्नात चित्रपट पाहतोय, हेच समजत नव्हते. काही कर्मचाऱ्यांना अक्षरशः धडकी भरली होती. काहींना बोलताही येत नव्हते. चित्रपटात थरार पाहिला होता. आमच्या आयुष्यात असा प्रसंग पाहिला नाही. आता समोरच घटना घडल्याने जणू चित्रपटापेक्षाही भयंकर, अशीच प्रतिक्रिया व्यक्त झाली.

भेदरलेले कर्मचारी

गोळीबाराची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि यात कोणीतरी ठार झाल्याची चर्चाही सुरू झाली आणि किणी पथकर कर्मचाऱ्यांच्या घरून विचारणा सुरू झाली. ‘अरे बाळ, तू सुखरूप आहेस का?’ काही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी थेट पथकर नाकाच गाठला. तेही भेदरले. प्रतिक्रिया देण्याची कुणाचीही मानसिकता नव्हती. सुट्टी होताच कर्मचाऱ्यांची सुटकेचा निःश्वास सोडला.

वाहतूक ठप्प

या घटनेनंतर पुण्याकडे स्विफ्ट गाडी लेनमध्येच आडवी असल्याने व एका लेनमध्ये पोलिसांची वाहने उभी असल्याने उर्वरीत दोन लेनमधून वाहने जात असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. रात्री बारापर्यंत वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. काही वाहने वाठारवर थांबून होती.

परिसरातील बघ्यांची गर्दी

गोळीबाराची माहिती मिळताच किणी, घुणकी, वाठार परिसरातील युवकांसह बघ्यांची गर्दी झाली. जखमींना दवाखान्यात हलविले मात्र एकास घटनास्थळीच थांबविल्याने त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची फौज मागविली. महिला पोलीसांसह आरसीएफची फौज आल्याने परीस्थिती नियंत्रणात आली.पंचनाम्यानंतर एका आरोपीस नेण्यात आले.

अशी घटना पहिल्यांदाच

किणी पथकर नाका २००२ पासून सुरू झाला असून अनेक वेळा मारामारीचे प्रकार घडले; मात्र गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील बचावासाठी झालेला पहिलाच प्रसंग असल्याचे नागरिकांनी सांगितले.

आणि फायरिंग सुरू झाले

या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलिसांची एक टीम थांबली व पाठीमागील बाजूस एक थांबली होती. आर. जे. असा उल्लेख असलेल्या  गाडीचा शोध घेत असतानाच गाडी सापडताच थांबविण्याचा इशारा देऊनही न थांबविल्याने पोलिसांनी काचेवर दगड मारला आणि थरार सुरू झाला.

सीसी.टीव्ही.त कैद

पथकर नाक्‍यावरच घटना घडल्याने पूर्वीकडील बाजूला सीसी.टीव्हीत नोंद झाली असण्याची शक्‍यता आहे.
आक्षेपार्ह साहित्य मोटारीची तपासणी करीत असताना गाडीत अाक्षेपार्ह साहित्य सापडले असल्याची घटनास्थळी चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT