fish sakal
कोल्हापूर

मासा हवा; पण काटा नसलेला...

कोल्हापुरातील खवय्यांची मत्स्य पसंती

अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापुर : ‘एव्हरी डे इज नॉट ए संडे फॉर फिश ओनली’ अशा अर्थाची एक मासे खाणाऱ्यांसाठीची म्हण आहे. प्रत्येक रविवारी ज्याला आवडेल तो मासा मिळेलच असे नाही. मात्र, मासा खाताना जबड्याला, जिभेला तो टोचला, अडकला नाही पाहिजे, ही काळजी घेतली जाते. यासाठी काटा नसलेले समुद्री व‌ नदीचे मासेच विकत घेण्याचा कल कोल्हापुरी मासे खवय्यांकडे दिसतो. त्यासाठी तळ कोकणातून समुद्री मासा आणताना त्यात कमी काटा किंवा मध्यभागी एकच काटा असेल अशाच प्रजाती आणाव्या लागतात.

नदीच्या माशांमध्ये काटे अधिक असणाऱ्या खूप प्रजाती आहेत. पण, अलीकडे जिल्ह्यातील अनेक नद्या, तलावांत कमी काटा असलेल्या माशांची पैदास होते. आठवड्याला दोन हजार टन समुद्री मासा इथे येतो; तर महिन्याला दोन ते तीन टन नदीच्या माशांची विक्री होते. महाग असला तरी अधिक मागणी समुद्री माशांनाच आहे.

समुद्रातील हजारो माशांच्या प्रजाती अन्नामध्ये वापरल्या जात असल्या तरी फक्त ठराविक मासेच कोल्हापूरमध्ये येतात. विशेषत: लहान माशांना अधिक काटे असल्याने ते इथे आणले जात नाही. असे लहान मासे फक्त तळ कोकणातील लोकच अन्नामध्ये वापरतात. कारण काटा अलगत बाजूला काढून खाण्यात कोकणी लोक तरबेज आहेत. कोल्हापुरी मासे खवय्या मात्र काट्यांच्या नादाला लागत नाही, असे मासे विक्रेत्यांनी सांगितले.

कोल्हापुरात उपलब्ध समुद्री मासा

सुरमई, बांगडा, छोटे प्रॉन्स, टायगर प्रॉन्स, पांढरा अन्‌ काळा पापलेट, तारली, मांदेली, बोंबील, कोकारी पापलेट, मोड्यूसा, रावस, शिंपला, समुद्री खेकडे, सौंदळ, शार्क, स्क्विडस्‌, राणी मासा.

समुद्री माशांचा ‘ट्रॅक’ विजयदुर्ग, देवगड, मालवण, गोवा, मुंबई, रत्नागिरी, रायगड येथून येतो

  1. दररोज चार टेम्पोतून आवक

  2. एका टेम्पोत ५०० किलो मासे

  3. शुक्रवारी दोन टन

  4. मंगळवारी दोन टन

  5. रविवारी साडेचार टन समुद्री मासे

  6. शनिवारी, रविवारी अधिक गर्दी

  7. मटण मार्केटमध्ये समुद्री माशांसाठी २६ गाळे

  8. सकाळी होलसेल विक्री झाल्यानंतर समुद्री मासे घेऊन जिल्ह्यातील अन्यत्र भागांत पाठवण.

नदीतील माशांचे प्रकार

कटला, रोहू, तांबर, कानस, मरळ, पानगा, रावस, टाकळी, टिलापिया, रुपचंद, पालू, शेंगाडा, कटारनी, वैशोडा, वॉम्ब, सप्रुन, चिंगळ्या, वंजा, खाडी सुरमई असे प्रकार मिळतात. मरळींच्या मुख्यत्वे चार जाती आहेत. त्यापैकी, चॅना मरूलियस (मरळ किंवा फुलमरळ), चॅ स्ट्राएटस (पट्टमरळ किंवा धडक्या), चॅ पंक्टॅटस (बोटरी मरळ), चॅ गाचुआ (डाकू, डोक किंवा डोकऱ्या) असा प्रकार आहे. मरळींचे डोके सापाच्या डोक्यासारखे चपटे असल्यामुळे इंग्रजीत ऑफिओसेफॅलस किंवा स्नेकहेडेड फिश म्हणतात. मुख्यतः महाकाय मरळ, पट्टेरी मरळ, ठिपकेदार मरळ या तीन जातींचा वापर होतो. मरळ ही जिल्ह्यातील नदी, तळे, पाणी साठवणीची जागा, कृत्रिम तलाव, लहान सरोवर, दलदलीच्या भागात सापडते.

दृिष्टक्षेपात नदीचा मासा

  1. पंचगंगा खोऱ्यातील ८३ किलोमीटर

  2. लांबीवरील नऊ नदीभाग मासेमारीसाठी ठेका

  3. चार ते पाच हजार लोक मासे व्यवसावर अवलंबून

  4. ओढजाळे, सोडजाळे, फेक जाळे, गळाद्वारे मासेमारी

  5. अंदाजे २०० ते २५० टन वार्षिक उत्पादन

नदी प्रदूषणामुळे माशांच्या उत्पादनावर परिणाम

  1. नदीमध्ये माशांच्या ७१ प्रजाती होत्या

  2. अलीकडे ७१ प्रजातींपैकी फक्त ३१ जाती सापडतात

  3. सुमारे ४० जाती नष्ट झाल्या असाव्यात, असा अंदाज

  4. शिंगाडा, पानगा, खवली, कोळशी मासे दुर्मिळ

(स्त्रोत : मत्स्य व्यवसाय विभाग)

पंचगंगा नदी, जिल्ह्यातील कृत्रिम तलाव, अन्य जलस्त्रोतातून तसेच हैदराबादहून नदीचा मासा इथे आणला जातो. महिन्याला अंदाजे दोन ते तीन टन नदीच्या माशांची विक्री होते. अलीकडे पानगा, रुपचंद, कटला, रोहू, टिलॅपिया माशांना ग्राहकांकडून अधिक मागणी असते.

-साद पाटणकर,

नदींच्या माशांचे विक्रेते

कोल्हापुरातील मासे खवय्ये काटा नसलेले मासे अधिक आवडीने खातात. यासाठी आम्ही काटा नसलेले समुद्री मासेच उपलब्ध करुन देतो. काटा अधिक असेल तर लोक घेत नाहीत. यासाठी जशी आवड असेल तशा पद्धतीने समुद्री माशांच्या प्रजाती आणाव्या लागतात.

-शैलेश घोटणे,

समुद्री मासे विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : मालेगावात हलगर्जीपणाचा कळस! मृत शिक्षकाला लावली निवडणूक ड्युटी; गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस

Latest Marathi News Live Update : त्र्यंबकेश्वर मंदिरात ५ जानेवारीपर्यंत VIP दर्शन बंदी, जिल्हा प्रशासनाचे आदेश

Karuna Munde हिंदूंनी ४ मुलं जन्माला घालावीत म्हणणाऱ्या Navneet Rana ना टोला | Sakal News

Mumbai News: ९०७ हॉटेल, पब, बार, क्लबची झाडाझडती; अग्निशमन दलाकडून आस्थापनांवर कारवाईचा बडगा

Nashik Wine : नाशिकच्या 'रानमेव्या'चा अमेरिकेत डंका; जांभूळ वाइनची पहिली खेप सातासमुद्रापार रवाना!

SCROLL FOR NEXT