Kagal : गेले मासे पकडायला अन् सापडली मगर; पुढे काय घडले वाचा? sakal
कोल्हापूर

Kagal : गेले मासे पकडायला अन् सापडली मगर; पुढे काय घडले वाचा?

दूधगंगा नदीला बारमाही पाणी असल्याने, नदीपात्रात मासे पकडण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे

सकाळ वृत्तसेवा

कागल : येथील दुधगंगा नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरूणाला आज वेगळाच अनुभव आला. मासे पकडण्यासाठी नदीपात्रात टाकलेल्या गळाला चक्क सहा फुट लांबीची मगर लागली. त्यामुळे घाबरलेल्या त्याने गळासह दोराच सोडून दिला. या घटनेची आणि दुधगंगा नदीपात्रातील मगरीच्या वावर असल्याची चर्चा सर्वत्र जोरात सुरू आहे.

दूधगंगा नदीला बारमाही पाणी असल्याने, नदीपात्रात मासे पकडण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच मासा खाण्याची तलफ आल्यानंतर नदीवर गळ घेऊन जाणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. असाच कागल शहरातील एक तरुण मनात माशाच्या पार्टीचा बेत आखत सकाळी सकाळी गळ घेऊन दुधगंगा नदीवर गेला. मासा पकडण्यासाठी गळाला माशाचे खाद्य लावून त्याने गळ नदीच्या पात्रात टाकला. दोन - तीन वेळा गळाला लावलेले खाद्य मासा खाऊन गेला. मात्र त्याच्या गळाला मासा काही लागला नाही. तरूणानेही हार न मानता पुन्हा गळाला खाद्य लावून नदीच्या पात्रात टाकला आणि तो गळाला मासा लागण्याची वाट पाहू लागला.

गळाला लावलेले खाद्य मासा खात असल्याची जाणीव तरुणाला झाली. त्यामुळे त्याने गळ ओढण्यास सुरुवात केली. गळ बाहेर ओढल्यानंतर त्याने स्वप्नातही पाहिले नाही, अस दृश्य त्याच्या नजरेस पडले. गळाला माशा ऐवजी चक्क भली मोठी मगरच लागली होती. मासे पकडताना गळाला खेकडे आणि कासव लागल्याचे ऐकायला मिळते पण मगर गळाला लागणे दुर्मीळ. या घटनेची आणि दुधगंगा नदीतील मगरीच्या वावराची शहर आणि परिसरात चर्चा आहे. दोन दिवसापूर्वी याच परिसरात नदीकाठाला मेंढरे चारण्यासाठी गेलेल्या येथील विठ्ठल पाचगावे या मेंढपाळास या मगरीचे दर्शन झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून टीका; मनोज जरांगे पाटलांनी कराडच्या सभेत दिलं थेट उत्तर, म्हणाले...

Alephata Crime : मानसिक छळामुळे तरुणीने संपविले जीवन; शिक्षकावर गुन्हा दाखल

समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर अपघात; एन्डेवर चालक व दूचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT