five persons arrested for old man murder case kolhapur 
कोल्हापूर

ब्रेकिंग - कोल्हापूर ; वृध्दाच्या खून प्रकरणी बावड्यातील पाच जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

पेठवडगाव (कोल्हापूर) - अंबपवाडी रस्त्यावर अज्ञात व्यक्तिच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी कसबा बावडा येथील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून अनखी काही जणांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
 अंबपवाडी रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा हात पाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. घातपाताचा संशयाने पोलिसांनी तपस करत या प्रकरणी योगेश रविंद्र तांदळे (वय.23 ,टेंपो चालक),सुशांत जयवंत माने(वय.19,मातंग वसाहत),निखील रघुनाथ बिरंजे(वय.25,पिंजारगल्ली),दत्तात्रय हिंदुराव शिंदे(वय.46,जयभवानी गल्ली),शुभम सचिन कोळी(वय.22,चावडी जवळ,सर्व रा.क.बावडा) यांना ताब्यात घेतले आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी कि, खुन झालेली व्यक्ति वेडसर असुन कसबा बावडा येथील नवनाथ मठ परिसरात रहाते. काही वेळा वेडाच्या भरात नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार घडत होते. काही दिवसांपूर्वी मंदिरात सेवेसाठी असणाऱ्या अंध सेवेकऱ्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला होता. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे वरील संशयितांनी वेडसर व्यक्तीला गावाबाहेर सोडण्याच्या हेतूने पकडण्यास गेले असता त्याने दगड,विटा फेकुन मारल्या.यामुळे या तरुणाई त्याला मारहान करुन,पकडुन दोरीने बांधुन घातले.त्यानंतर त्याला अन्यठिकाणी साेडण्यासाठी टेंपो मध्ये घेऊन पुणे-बंगलुर राष्ट्रीय महामार्गावर अनले. व अंबपवाडी रोड येथे सोडुन परतले. दरम्यान त्याचा जखमी अवस्थेत मृत्यु झाला दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली. या नंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे या संशयितांचा मग काढण्यात आला.

 याबाबत पुढील तपास वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार,बाबासो दुकाणे,पोलिस नाईक दादा माने,संदीप गायकवाड,योगेश राक्षे,रणवीर जाधव,शिरोली पोलिस ठाण्याचे सतिश जंगम,समीर मुल्ला,सुरज देसाई,कोल्हापुर शहर उपविभागीय कार्यालयातील गौरव चौगुले,अमर अडसुळे करीत आहेत.


संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT