the flower of smithia hirustha grow in shivaji university area in kolhapur 
कोल्हापूर

स्मिथिया हिऱ्सुता पाहायचा आहे का ? मग या कोल्हापूराला

ओंकार धर्माधिकारी

टेंबलाईवाडी (कोल्हापूर) : शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर पिवळ्या फुलांचा गालीचा अंथरावा, असे दृश्‍य आहे. 'कवला' या गवतवर्गीय वनस्पतीची ही फुले असून, दहा ते पंधरा वर्षांपासून नित्यनियमाने या परिसरात ती उगवतात. याचे शास्त्रीय नाव स्मिथिया हिऱ्सुता असे आहे. ती पश्‍चिम घाटातील दुर्मीळ वनस्पती आहे. या फुलांमुळे विद्यापीठाचा मनोहारी परिसर आणखी बहरला आहे.    

विद्यापीठ परिसरात विपूल जैवविविधता पाहायला मिळते. विविध प्रकारचे किडे, पक्षी, सरीसृप, प्राणी इथे आहेत. वनस्पतींचे असंख्य प्रकार विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरात आढळतात. आता 'स्मिथिया हिऱ्सुता' या वन्सपतींची भर पडली आहे. या वनस्पतीचे मराठीमधील नाव कवला किंवा कवळा असेही आहे. ही वनस्पती गवतवर्गीय असून, तिला पिवळी फुले येतात.

विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानात ही फुले पाहायला मिळतात. अत्यंत नाजूक असणारी ही फुले गालीच्या अंथरावा अशीप्रकारे भासतात. त्यांचा बहर एक वर्षाआड येतो. पाणथळ जागेत ही वनस्पती उगवते. पूर्वी पश्‍चिम घाटातील पठारे, माळ येथे मोठ्या संख्येने दिसणारी ही वनस्पती आता कमी प्रमाणात उगवते. त्यामुळे तिचा समावेश दुर्मीळ प्रजातींत केला गेला आहे. उन्ह कमी व्हायला लागले की ही फुले आणि पाने मिटून घेतात. 

दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवतात. साधारण लाजाळूसारखी तीन ते चार पानांच्या  जोड्यांची संयुक्त पाने असतात. या पानांमधून वर कळ्यांचा झुपका येतो. एक किंवा जास्त फुले एकाचेळी फुलतात. हा फुलांचा बहर दोन ते तीन आठवडे जोरात असतो. नंतर शेंगा तयार होतात आणि त्या वाळून फुटतात. त्यातून पडलेल्या बियापासून पुन्हा पुढच्या वर्षी रोपे उगवतात. पिवळ्याधमक रंगांच्या या फुलांत लाल रंगाचा आकर्षक ठिपका असतो. त्यामुळे ती मिकी माउससारखी अनेक जणांना भासतात. त्यांना मिकी माऊस फ्लॉवर्स किंवा डोनाल्ड डक फ्लॉवर्स असेही म्हणतात. 

स्मिथिया हिऱ्सुता...

'स्मिथिया' हे संशोधक सर जेम्स एडवर्ड स्मिथ यांच्या नावावरून घेतले आहे, तर त्याच्या खोडावर केसासारखी रचना दिसते, म्हणून पुढे हिऱ्सुता जोडले गेले. मराठीत कवळा किंवा कवला नावाने ओळखले जाते. भारताबरोबर ते चीन, जपान, मलेशिया, उत्तर ऑस्ट्रेलिया या देशातही आढळते. हे झाड साधारण १५ ते ९० सेंटीमीटरपर्यंत वाढते. काही भागांत याच्या पानांची भाजी खात असल्याचा उल्लेख आढळला. तसेच जमीन कसदार बनवण्यासाठी ही वनस्पती उपयुक्त ठरते.

पश्‍चिम घाटातील दुर्मीळ वनस्पती

"स्मिथिया हिऱ्सुता ही वनस्पती दहा ते बारा वर्षांपासून शिवाजी विद्यापीठात उगवते. या वनस्पतीच्या फुलांवर मधमाश्‍या, फुलपाखरे पाहायला मिळतात. यातून याचे पर्यावर्णीय महत्त्व अधोरेखित होते. या वनस्पतीमुळे विद्यापीठाचा परिसर तर 
आकर्षक दिसतो."

- प्रा. डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT