folk art of chandgad khele and songe information and special story of sandip khandekar in kolahpur 
कोल्हापूर

कोल्हापूर : चंदगडचा 'खेळे' लोककला प्रकार तुम्हांला माहित आहे का ?

संदीप खांडेकर

कोल्हापूर : ‘प्रथम सूर्य उगावला, सूर्य नमस्कार केला, आदी वाड गे आई, पैल्या दुधावैली शाई’ या जतीने खेळ्याची सुरवात होते. पुढे जतीत रामायणाची कथा उलगडत जाते. लोककलांत सोंगे व खेळे हे प्रकार विशेष प्रसिद्ध. सोंगे कोकणातही खेळले जातात. पण, खेळे हा लोककला प्रकार केवळ चंदगडमध्येच पाहायला मिळतो.

मार्चमध्ये शिमग्याच्या वेळी चंदगड तालुक्‍यात गावोगावी सोंग्यांसह खेळे हा लोककला प्रकार उत्साहाने सादर होतो. 
सोंगांमध्ये गावातील काही तरुण वेगवेगळी वेशभूषा करून दारोदारी जात तत्कालीन सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारी गाणी गातात; तर खेळे या सामूहिक लोककला प्रकारात तीन संगीत साथीदारांबरोबर किमान दहा साथीदार असतात. संगीत साथ देताना डफ, कासाळ व नळी या संगीत साधनांचा वापर केला जातो. 

चंदगड तालुक्‍यात शिमग्याच्या पहिल्याच दिवशी रात्री व्हळीचे लग्न होते. लग्न लावताना खेळे (लोककला सादर करणारे कलाकार) जत म्हटली जाते आणि व्हळीच्या लग्नाचा विधी पूर्ण होतो. खेळ्यांना या दिवशी झालेली सुरवात शिमगा शिंपण्याला म्हणजेच रंगपंचमी दिवशी संपते. खेळ्यांनी गावातील चव्हाटा दुमदुमतो. रोज रात्री चव्हाट्यावर लयबद्ध ‘जती’  लोकांना ताल धरायला लावतात. व्हळीच्या आसपास पेटवलेल्या हुलगा (शेकोटी)भोवती फेरा धरून खेळे सात दिवस उत्साहाने सादर केले जातात.

खेळ्याचे स्वरूप धनगरी गजी नृत्याजवळ जाणारे असते. खेळे प्रकारातून रामायण लोकांसमोर सांगितले जाते. रामायणातील पात्रे श्रोत्यांपुढे उभी केली जातात. पूर्वीच्या प्रथेत तळीत कमी-जास्त पैसे पडल्यास गावचे लोक त्यात भर घालत. त्यातून बकऱ्यांचा मान दिला जायचा. पुढे प्रसाद म्हणून प्रत्येक घरात त्याचा वाटा पोचविला जायचा. मानाची बकरी कापण्याचा प्रकार सोडला तर बाकी शिमगा मोठाच होत आहे. 

शिमग्यात सादरीकरण

शिमग्यात ही लोककला सादर केली जाते. या लोककलेचे स्वरूप धनगरांच्या गजीनृत्याशी जवळ जाणारे. परंतु गीते वेगळी. ही कला महाराष्ट्रात केवळ चंदगड परिसरातच विशेषत्वाने दिसते, असे प्रा. डॉ. नंदकुमार मोरे आवर्जून सांगतात.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT