four wrestler preparation for maharashtra kesari in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्याचा 'महाराष्ट्र केसरी'चा २० वर्षांचा दुष्काळ संपणार ?

मतीन शेख

कोल्हापूर : 'महाराष्ट्र केसरी' या मानाच्या कुस्ती स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा निवड चाचणी नुकतीच पार पडली. जिल्हाभरातील मल्लांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. कोरोना महामारी नंतर पहिल्यांदाच ही मानाची स्पर्धा होत असल्याने मल्लांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. 64 व्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरीच्या खुल्या गटासाठी जिल्ह्यातून पै. पृथ्वीराज पाटील, पै. कौतुक डापळे, पै. शुभम सिध्दनाळे हे चार शिलेदार महाराष्ट्र केसरीसाठी नशीब अजमावनार आहेत.

पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये ही स्पर्धा होणार आहे. गेल्या 20 वर्षांपासून कोल्हापुरला महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठीची असणारी प्रतीक्षा यंदा तरी संपणार का ? असा प्रश्न आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर तालमीत शड्डू घुमायला लागले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तारीख जाहीर झाली नसली तरी मल्लांनी तयारी जोरात सुरु ठेवली आहे.

देवठाणे (ता. पन्हाळा) गावचा युवा मल्ल पृथ्वीराज पाटील याच्याकडून महाराष्ट्र केसरी गदेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यंदा गादी विभागातुन तो लढणार आहे. शाहू कुस्ती केंद्र येथे मुंडे आबा यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करतो. नुकत्याच झालेल्या सिनिअर नँशनल कुस्ती स्पर्धेत त्याने रौप्य पदक पटकावले आहे. भारंदाज डावावर प्रभुत्व असलेला पृथ्वीराज संयमाने पण तंत्रशुद्ध कुस्ती करण्यासाठी ओळखला जातो. कमी वयात अधिक प्रगती साधत त्याचे ऑलिम्पिक गाठण्याचे स्वप्न आहे.

तसेच जिल्ह्यातून दुसरा दावेदार म्हणुन पिंपळगाव (ता.कागल) येथील राष्ट्रीय मल्ल कौतुक ठापळे ही स्पर्धेत तयारीने उतरला आहे. गादी विभागातून तो प्रतिनिधित्व करत आहे. रेल्वेत नोकरीला असणारा कौतुक आंतराष्ट्रीय कुस्ती संकुल, पुणे येथे काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. अनेक स्पर्धांचा अनुभव त्याच्या पाठीशी असल्याने ही त्याची जमेची बाजु आहे. वजणाने कमी असला तरी आक्रमक व चपळतेने लढ्यानेचे त्याकडे तंत्र आहे.

माती विभागातून दत्तवाळ (ता.शिरोळ) येथील पै. शुभम सिद्धनाळे महाराष्ट्र केसरी गटात आपली ताकद दाखवणार आहे. शिवराम दादा तालिम, पुणे येथे तो सध्या सराव करतो. उभरता मल्ल म्हणुन त्याची ओळख आहे. ताकदीने आक्रमक लढत दुहेरी पट डाव मारत्यात त्याची खासीयत आहे. गादी विभागातूनच बाणगे गावचा पै. अरुण बोंगार्डे या स्पर्धेत उतरला आहे. मोतीबाग तालीमत विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करतो.

पवित्रा मजबुत ठेवत न थकता प्रतिस्पर्धी मल्लावर तो विजय मिळवतो. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत त्याने पदक मिळवले होते. या 4 मल्लांसह विविध गटात इतर 17 मल्ल सहभागी होत महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जिल्ह्याचा दबदबा कायम ठेवणार आहेत. या मल्लांच्या रुपाने जिल्ह्याचा 'महाराष्ट्र केसरी'चा दुष्काळ संपणार का ? याकडे कुस्तीशौकीनांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT