funeral of martyr Jawan Sangrampatil  
कोल्हापूर

शहीद जवान संग्राम पाटील यांच्या अंत्ययात्रेत जनसागर लोटला

राजेंद्र पाटील

चुये (कोल्हापूर) : शहीद जवान संग्राम शिवाजी पाटील यांच्या अंत्यसंस्कारावेळी निगवे खालसा गावात व क्रीडांगणावर जनसागर लोटला होता. सकाळी सव्वा दहा वाजता पोलिस व सैन्य दलाच्या वतीने प्रत्येकी तीन बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना देऊन अंत्यसंस्कार केले. 

सकाळी सहा वाजल्यापासूनच निगवे खालसा गावाकडे लोक चालत, सायकलीवरून व मोटरसायकलीवरून अंतयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते.आज सकाळी पावणेआठच्या सुमारास शहीद संग्राम पाटील यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणले. पत्नी हेमलता, वडील शिवाजी, भाऊ संदीप यांनी घरात पार्थिवाची पेटी पाहिल्यानंतर हंबरडा फोडला. त्यांच्या कुटुंबाने अंत्यदर्शन घेतल्यानंतर सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अंत्ययात्रेला सुरुवात झाली, गावातील मुख्य चौकातून सजवलेल्या ट्रॉलीतून क्रीडांगणावर सकाळी सव्वा नऊ वाजता अंत्ययात्रा पोचली होती. गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण गावातून, गल्ल्यातून रांगोळ्या काढून फुलांच्या पाकळ्यांनी रस्ते सजवून संग्राम पाटील यांना श्रद्धांजली वाहिली होती.

अंतयात्रेचा मुख्य मार्ग घोषणांनी दणाणून सोडला होता, तर पार्थिव ठेवलेल्या ट्रॅक्टर वरील साऊंड सिस्टिम मधून राष्ट्रभक्तीपर गीतामुळे संपूर्ण अंतयात्रा संचारलेली होती. अंत्ययात्रेत निगवे खालसा परिसरातील‌ तरुणाई, महिला व जेष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकरी सहकारी संघाचे व गोकुळ दूध संघाचे आजी-माजी संचालक, करवीर, कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील बिद्री साखर कारखाना, भोगावती साखर कारखाना, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. करवीरचे प्रांताधिकारी नानवडे , तहसीलदार शितल भामरे, करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी अंत्यसंस्कार ठिकांणाच्या कार्यक्रमावर नियंत्रण ठेवले होते. शोकसभेत श्रद्धांजली वाहताना खासदार संजय मंडलिक म्हणाले," कोल्हापूरचा व निगवे खालसाचा सुपुत्र देश सेवेसाठी शहीद झाला. आठ दिवसापूर्वीच बहिरेवाडीचे ऋषिकेश जोंधळे शहीद झाले होते. आठ दिवसानंतर दुसरी दुर्देवी घटना घडली आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत 150 हून अधिक जणांनी बलिदान दिले, संग्राम पाटीलने जिल्ह्याला अभिमान वाटावे असे कार्य देशसेवा करताना हौतात्म्य पत्करून केले आहे.

"पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले," संग्राम पाटील यांनी दोन वर्षाची अधिक देशसेवा करण्यासाठी सैन्यदलात मुदत वाढवून घेतली मात्र त्यांना वीरमरण आले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऋषिकेश जोंधळे आणि संग्राम पाटील ह्या दोन्ही कुटुंबांना राज्य शासनामार्फत प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. परिसरातील तरुणाईला संग्रामची स्मृती जपण्यासाठी स्मृतिस्तंभ उभा करावा अशी सूचना आमदार ऋतुराज पाटील यांना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिली."

मान्यवरांनी वाहिलेली पुष्पचक्र...
 छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार अमल महाडिक, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, सैन्यदलाचे मेजर शिवाजी सूर्यवंशी, अतिरिक्त पोलीस प्रमुख तिरुपती काकडे, सैनिक दल कमांडर कर्नल डी. एस. नागेश, स्टेशन कमांडर सिताराम दळवी, नारायण नरवडे,आजी माजी सैनिक संघटनेचे कोल्हापूर अध्यक्ष लक्ष्मीकांत हांडे,कर्नल प्रदीप ढोले रिटायर्ड कर्नल शिवाजीराव बाबर, जिल्हा सैनिक कार्यालय प्रतिनिधी शिवाजी पवार, शशिकांत चौगुले कर्नल विजय गायकवाड, सरपंच पांडुरंग महाडेश्वर ,करवीर पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे, सुभेदार मेजर बाळू तांबे, सुभेदार मेजर संतोष कोकणे, रिटायर्ड सुभेदारअनिल देसाई, सुभेदार जयसिंग देशमुख, वडील शिवाजी रामचंद्र पाटील, भाऊ संदीप शिवाजी पाटील यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.

 आज सकाळी सुर्योदया पासूनच परिसरातील तरूणाई, महिला व नागरिकांनी पायी चालत, सायकली, मोटर सायकल किंवा मिळेल त्या वाहनाने शहीद संग्राम शिवाजी पाटील यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी निगवेकडे आले होते.

येथील शहीद संग्राम पाटील यांच्या अंत्ययात्रा अंत्यसंस्कार देखरेख ठेवण्यासाठी आज सकाळपासून एक पोलिस उपाधीक्षक, दोन पोलिस निरीक्षक,सात सहायक पोलिस निरीक्षक यांच्यासह 131 पोलिसांचा फौजफाटा गावांमध्ये तैनात होता.

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महापालिकेसाठी वळणाचे वर्ष! निवडणूक रणशिंग, राजकीय समीकरणांची उलथापालथ आणि विकासकामांचा वेग

January 2026 Planetary Transit: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भव्य ग्रहसंयोग! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव

KDMC Election: केडीएमसी निवडणुकीत भाजपचा विजयरथ सुरू; तिसऱ्या उमेदवाराची बिनविरोध निवड, जाणून घ्या नावे

Viral: व्हायरल ठरणारी जपानी हेअर वॉशिंग मेथड नेमकी काय? केसांच्या आरोग्यासाठी कितपत फायदेशीर जाणून घ्या

Tractor JCB Fraud : कळंबमध्ये ट्रॅक्टर–जेसीबी घोटाळा उघड; भाड्याच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; पाच आरोपी अटकेत!

SCROLL FOR NEXT