gadhinglaj kolhapur case 13 year old girl died neck was caught in a pipe 
कोल्हापूर

खेळण्याच्या आनंदातच काळाने गाठले तेरा वर्षीच्या मुलीला

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज (कोल्हापूर)  : येथील डॉक्‍टर कॉलनीत घराच्या टेरेसवर खेळताना पाईपच्या अँगलला गळ्यातील ओढणी अडकून एका १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविना भवराराम चौधरी असे तिचे नाव आहे. 


याबाबतची माहिती अशी

भवराराम चौधरी कुटुंबीय मूळचे चिमणा राम, बाडमेर (राजस्थान) येथील आहे. व्यवसायनिमित्ताने हे कुटुंब अनेक वर्षांपासून गडहिंग्लज येथे वास्तव्यास आहे. डॉक्‍टर कॉलनीत ते भाडेतत्त्वावरील इमारतीत राहतात. आज सायंकाळी नेहमीप्रमाणे रविना व इतर मुली टेरेसवर खेळत होत्या. 

हेही वाचा- मसाई पठारावर नवरंगांचा उत्सव : रानफुलांना आला बहर -

टेरेसवर पाण्याची टाकी आहे. त्याला एल आकाराचे पाईपचे अँगल आहे. सर्व मुली खेळत असताना रविनाच्या गळ्यात असलेली ओढणी त्या अँगलमध्ये अडकली. त्यातच तिला गळफास लागला. सोबतच्या मुलींना काही समजायच्या आतच तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना समजताच रविनाचे नातेवाईक धावत टेरेसवर पोहचले. तिची अवस्था पाहून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. खेळण्याच्या आनंदात असतानाच रविनाला काळाने गाठले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भवराराम चौधरी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. हवालदार प्रशांत गोजारे तपास करीत आहेत. रविना सातवीत शिकत होती.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने झाले महाग, चांदीतही २१०० रुपयांची वाढ; तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या

Pune-Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्ग १० तास ठप्प; मंचरमधील आंदोलनाचा फटका; वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल..

Latest Marathi News Live Update : अमेरिकेत ७००० ड्रायव्हर्सवर बंदी, भारतावर परिणाम

Kolhapur Kalamba Jail : कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये सापडली जिवंत काडतूसे, पुण्यातील आंदेकर टोळी कनेक्शन? सुरक्षा यंत्रणांना दिला चकवा

Pune School Controversy: शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे कापले केस; स्वतंत्र शुल्क आकारल्याची माहिती

SCROLL FOR NEXT