gadhinglaj mahagaon sarpanch request worker corona corona virus  
कोल्हापूर

Video:कोरोना रोखण्यासाठी आवाहन करताना, महिला सरपंचांना कोसळले रडू

अजित माद्याळे

गडहिंग्लज (कोल्हापूर) : खरे तर कोणत्याही संकटावेळी माणूस देवाचा धावा करतो. परंतू कोरोनाच्या परिस्थितीत पुणे, मुंबईकरच आमचे देव आहेत. संपूर्ण गावातर्फे मी तुमच्यासमोर नतमस्तक होते. गावची परिस्थिती समजून घ्या. बाहेर फिरू नका. तुम्हाला होम कॉरंटाईन केले आहे. तुम्ही घरीच बसा. गावच्या विकासात देणगी देण्यासाठी सातत्याने पुढे येणारे पुणे-मुंबईकर कोरोना विषाणू पसरविण्यातही पुढे होते, असा तुमच्यावरील ठपका मला सहन होणार नाही. यामुळे सद्य परिस्थिती समजून घेवून गावाला सहकार्य करा. अश्रू ढाळत महागावच्या (ता. गडहिंग्लज) सरपंच ज्योत्स्ना पताडे भावना व्यक्त करीत होत्या. 

सरपंच पताडे यांची ही भावना प्रातिनिधीक आहे. सर्वच खेड्यांतील सरपंचांनी चाकरमान्यांसमोर हात टेकले आहेत. प्रत्येकाची भावना हीच आहे. कोरोना विषाणू बाधित पुणे व मुंबई शहरातून पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या तरूणांची फौज आपापल्या गावात दाखल झाली आहे. आरोग्य यंत्रणेने त्यांना होम कॉरंटाईनचे शिक्के मारलेत. तरीसुद्धा चाकरमानी मोकाट फिरत आहेत. काही ठिकाणी पार्ट्याही सुरू आहेत. यामुळे गावकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना तयार होत आहे. सांगूनही ऐकेनासे झाल्याने दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हातात काठी घेतली आहे. प्रांताधिकारी, तहसीलदारांनी मोकाट फिरणाऱ्या पुणे-मुंबईकरांची नावे कळविण्यास सांगनू कारवाईचा इशारा दिला आहे. तरीही आपल्याच गावची पोरं आहेत या भावनेतून पदाधिकारी संयमाची भूमिका घेत आहेत. परंतु त्याचाही अधिक गैरफायदा घेतला जात असल्याचे चित्र आहे. 


 

भावांनो...तुमच्या गावासाठीच... 
आपलं गाव सर्वांगसुंदर, विकासाभिमुख आणि आरोग्यपूर्ण असावे यासाठी चाकरमान्यांकडून मदतीचे हात नेहमीच पुढे येतात. हे गावानेही मान्य केले आहे. ज्या गावच्या भल्यासाठी आपण आर्थिक हातभार लावत आहात, त्याच गावातील ग्रामस्थ कोरोना विषाणूच्या वातावरणात असुरक्षित असतील तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही अप्रत्यक्षपणे आपल्यावरच येते. म्हणूनच गावचे पदाधिकारी ओरडून सांगताहेत तर ऐका, असे आवाहन प्रत्येक सरपंच करताना दिसत आहेत. 

सरपंचांकडे गावचे पालकत्व असते. म्हणूनच गावच्या सुरक्षेची जबाबदारी सरपंचावर असते. आईच्या भूमिकेतून चाकरमानी तरूणांना मी आवाहन केले आहे. गावकऱ्यांना सुरक्षित वाटेल असे वर्तन करावे. रागाची प्रवृत्ती बाळगू नका. प्लीज घरात बसा. गावच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावरही आहे. हे विसरू नका. 
- ज्योत्स्ना पताडे, सरपंच महागाव (ता. गडहिंग्लज)  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan on Epstein files : ‘मराठी माणूस पंतप्रधान होणार’ यावर पुन्हा पृथ्वीराज चव्हाणांनी केलं वक्तव्य, फुसका बार की मराठी पंतप्रधान?

Bangladesh Crisis: बांगलादेश पेटला! युवा नेत्याच्या हत्येनंतर राजधानीत आग, वर्तमानपत्रांची कार्यालये जळाली; देश अराजकतेच्या उंबरठ्यावर

Mumbai Local Megablock: मुंबई लोकलनं प्रवास करताय? पण मेगाहाल होणार; पाहा कुठे अन् कोणत्या मार्गावर असणार मेगाब्लॉक?

'मी रक्तबंबाळ झालो, ७ वर्षांच्या लेकीला धक्का', पायलटची प्रवाशाला कुटुंबियांसमोर मारहाण

UGC NET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तुमचा विषय कधी आहे?

SCROLL FOR NEXT