ganesha festival is not a large crowd of devotees in traditional attire in kolhapur 
कोल्हापूर

हौशी कलाकारांचा महाद्वार आज सूना-सूनाच

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : ढोल-ताशा पथकांचा घुमणारा दणदणाट यंदा नाही. पारंपरिक वेषात बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेल्या भक्तांची अलोट गर्दी नाही. मंडळांचे प्रबोधन करणारे चित्ररथ नाहीत. बंद दुकाने, चिंतातूर चेहऱ्यांनी वावरणारी तुरळक माणसे अशा विचित्र वातावरणातील सकाळ आज महाद्वार रस्त्याने ऐन अनंतचतुर्दशीला अनुभली.

शहरातील बहुतांशी मंडळांनी सकाळच्या सत्रातच सार्वजनिक कुंडात गणेश विसर्ज केले. तर काही जणांनी मोजक्‍या कार्यकर्त्यांबरोबर जावून इराणी खणीत विसर्जन केले. सकाळी अत्यंत उत्साही वातावारणात होणारी विसर्जन मिरवणूक यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झाली नाही. 


अनंतचर्तुदशीला दरवर्षी महाद्वार रस्ता हा हौशी कलाकारांचे हक्काचे ठिकाण असते. शहरातील बहुतांशी मंडळांचे कार्यकर्ते सकाळी पारंपरिक वाद्याच्या तालावर फेर धरत गणेश विसर्जन करतात. या मंडळांची मिरवणूक सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू असते. यंदा मात्र कोरोनामुळे ही सकाळाच्या सत्रातील मिरवणूक झालीच नाही. महाद्वार रस्त्यावर मंडळाना प्रवेश बंदी करण्यात आल्याने रस्ता रिकामाच होता. माणसांची तुरळक ये जा सोडली तर या रस्त्याने शुकशुकाटच अनुभवला.

मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, रविवार पेठ, जूना बुधवार पेठ येथील बहुतांशी मंडळांनी कुंडामध्ये मूर्ती विसर्जित केली. तर काही मंडळांनी इराणी खणीवर जावून गणेश विसर्जन केले. उपनगारीतल मंडळांनी खणीवर मूर्ती विसर्जनास प्राधान्य दिले. टाळ्या वाजवत आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या असा गजर करत कार्यकर्त्यांनी मूर्ती विसर्जन स्थळापर्यंत नेली. सकाळी विसर्जन मोठ्या प्रमाणात झाले.  

संपादन -  अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य ड्रोन शो

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

Kunbi Certificates: ''भुजबळांना कुणबी प्रमाणपत्रांबद्दल आक्षेप असेल तर..'', फडणवीसांनी स्पष्टच शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT