gates of Panhala fort which had been closed for seven months finally opened  
कोल्हापूर

सात महिन्यांनंतर पन्हाळा गडाचे दरवाजे उघडले

आनंद जगताप

पन्हाळा (कोल्हापूर) :  तब्बल सात महिने बंद असलेले पन्हाळा गडाचे दरवाजे अखेर आज सकाळी उघडले, आणि मोठ्या दिमाखात मोटरसायकल वरुन आलेल्या एका युवकयुवतीच्या जोडीने प्रवासी कराची पावती फाडून गडात प्रवेश केला.पाठोपाठ बारामती ची चारचाकी आली, आणि त्यानंतर कर्नाटक सह कोल्हापूर परिसरातील दुचाकी, चारचाकी गाड्यांची रांग लागली, दुपारी बारा वाजेपर्यंत नाक्यावरील कर्मर्च्यानी दीड हजाराच्या आसपास प्रवासी कर गोळा केला.कालपर्यंत जे नाक्यावरील कर्म‌‌‌चारी पन्हाळा बंद आहे,परत जा,असे नाक्यावर लावलेल्या बैरिकेटस च्या बाहेर येऊन ओरडून सांगत होते,तेच कर्मचारी आज गाड्या थांबवून साहेब,प्रवासीकर आहे, पावती घ्या, नि मग जा, असे अजिजीने सांगत होते.


पन्हाळगड गच्च हिरवाईने नटलायं,फुलारलायं, पक्षांनी चिवचिवाट मांडलाय,पण हे अनुभवायला पन्हाळकरांशिवाय कुणीच नव्हतं,कोरोना महामारी मुळे गडाचे दरवाजे मार्च महिन्यापासून बंद होते,पर्यटक नेहमीच्या सरावाने दररोज सकाळी संध्याकाळी, विशेषतः शनिवारी, रविवारी मोठ्या उत्साहात यायचे, पण नाक्यावर त्यांना अडवले जायचे, नाक्यावर गाड्यांची रांग लागायची, कोल्हापूर चालू मग पन्हाळा बंद का ? यावरून भांडण व्हायचे, पोलिसांनी मध्यस्थी करायची,नि मग लोक चार दरवाजातील दरडीवरून चढून तटबंदी वर फोटो सेशन करु लागले, सेल्फी काढू लागले, धोका होऊ नये, म्हणून प्रशासनाने नाका परिसरात गाड्या थांबवणेच बंद केले आणि घरात थांबून वैतागलेले पर्यटक हिरमोड होवून परंतू लागले.


गतवर्षी गडावर येणारा मुख्य रस्ता खचल्याने चार महिने पन्हाळा बंद होता, केवळ पर्यटकांवर अवलंबून असलेल्या येथील छोट्या मोठ्या हाँटेल , हातगाडी वाले ,गाईड यांचा त्यावेळेपासून बसलेला धंदा कोरोनामुळे आणखी बसला, आणि खायचे वांदे झाले म्हणून अखेर या व्यावसायिकांनी अखेर चार दिवसांपूर्वी नगराध्यक्षा सौ रूपाली धडेल, मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली आणि प्रशासनाने ही विचार करून काही अटींवर आजपासून पन्हाळा खुला केल्याची घोषणा केली, शासनाने ही 5 आक्टोबर पासून काही अटींवर हाटेल सुरू करण्याची परवानगी दिल्याने गडप्रेमीना हायसे वाटले आहे, नगरपरिषदेचा या कालावधीत लाखो रुपयांचा प्रवासीकर बुडला असला तरी पन्हाळा बंद करून प्रशासनाने कोरोनाचा प्रतिबंध केला आहे.

हेही वाचा- कोल्हापूरच्या मुलींची कौतुकास्पद कामगिरी: बनविली सौर उर्जेवर चालणारी ‘सोलरईबाईक' -

पन्हाळगड जरी सूरू झाला असला तरी येथील सदर इ महल,अंधारबाव, अंबरखाना या ऐतिहासिक इमारती बंदच आहेत, पुरातत्व खात्याच्या परवानगी शिवाय त्या खुल्या होणार नाहीत, त्यामुळे पर्यटकांना केवळ तटबंदीवर फिरत मोकळी हवा चाखत निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा लागणार आहे

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT