कोल्हापूर

'पीएन साहेब मी तुमचाच! मला तुमच्याबरोबरच राहायचं होतं पण...'

सकाळ वृत्तसेवा

'मी सत्ताधारी पॅनेलमध्ये असतो तर पॅनेल आले असते; मात्र मी पराभूत झालो असतो'

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या माध्यमातून ३५ वर्षांहून अधिक काळ गट-तट न पाहता शेतकऱ्यांना न्याय देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम करणारे आमदार पी. एन. पाटील यांची बँकेवरील बिनविरोध निवड काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी केले. फुलेवाडी येथील अमृत सभागृहात करवीरमधील ठरावधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. बाजार समितीचे माजी सभापती दशरथ माने अध्यक्षस्थानी होते. मेळाव्याला २५१ पैकी तब्बल २१७ ठरावधारक उपस्थित होते.

आमदार पी. एन. म्हणाले, ‘‘अध्यक्षपदाच्या पाच वर्षांत बँकेच्या ठेवी अडीच पटींनी वाढविताना ५४ शाखा काढल्या. शेतकऱ्यांना सात टक्के व्याजाने कर्ज देण्याचा देशातील पहिला निर्णय घेतला होता. कर्मचाऱ्यांना बोनस व बँकेची उलाढाल वाढल्याबद्दल एक पगार जादा दिला. विविध कर्ज योजना सुरू करून शेतकऱ्यांच्या विकासाला दिशा देण्याचा प्रयत्न केला.’’ करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, ‘‘करवीर तालुक्यात सेवा संस्था स्थापण्यात श्री. पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करणे आपले कर्तव्यच आहे.’’

‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जी. डी. पाटील (पाडळी खुर्द), एम. आर. पाटील (कुरुकली) व सर्जेराव भोसले यांचीही भाषणे झाली. मेळाव्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, श्रीपतरावदादा बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, कुंभी-कासारीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानी साळोखे, शशिकांत खोत, बाजार समितीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, राहुल माने, किरण पाटील आदी उपस्थित होते. आप्पासाहेब माने यांनी आभार मानले.

पी. एन. साहेब मी तुमचाच!

‘गोकुळ’च्या निवडणुकीत दुरावलेले विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आमदार पाटील यांना, साहेब मी तुमचाच आहे, असे सांगून मला तुमच्याबरोबरच राहायचे होते. मात्र, माझा वाद दुसऱ्यांशी होता. मी सत्ताधारी पॅनेलमध्ये असतो तर पॅनेल आले असते; मात्र मी पराभूत झालो असतो, असे सांगत आपण व पाटील एकत्रच असल्याचे स्पष्ट केले.

२१७ ठरावधारकांची उपस्थिती

जिल्हा बँकेवर ३६ वर्षे प्रतिनिधित्व करताना श्री. पाटील यांनी पाच वेळा बिनविरोध बाजी मारली आहे. या मेळाव्यालाही तालुक्यातील २५१ पैकी तब्बल २१७ ठरावधारकांनी उपस्थिती लावली होती; तर पाच जणांनी फोनवरून पाठिंबा कळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT