gokul election dominion of mushrif kore and patil unity is done at any cost said satej patil in kolhapur 
कोल्हापूर

कोणी, किती आणि काहीही म्हंटले तरी गोकुळमध्ये सत्तांतर होणारच ; गृहराज्यमंत्र्याचा विश्वास

सुनिल पाटील

कोल्हापूर : जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) निवडणूकीत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांच्यासह लोकसभा निवडणूकी दरम्यान झालेली युनिटीही एकत्रच असणार आहे. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर याचे नियोजन आहे. त्यामुळे, कोणी किती आणि काहीही म्हंटले तरीही गोकुळमध्ये सत्ता बदल हा होणार हे निश्‍चित असल्याचा विश्‍वास गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर प्रेस क्‍लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेतंनतर पत्रकारांनी गोकुळ संबंधीत विचारलेल्या प्रश्‍नाला त्यांनी उत्तर दिले. 

यावेळी पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आधारवड असणाऱ्या गोकुळचा कारभार चुकीच्यापध्दतीने सुरु आहे. गाय व म्हैसीच्या दुधाला अपेक्षीत दर मिळत नाही. हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे गोकुळच्या येणाऱ्या निवडणूकीत सत्तांतर करण्याचेच सभासदांनीही ठरवलं आहे. यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्तीसह इतर दिग्गजही या 'युनिटी'सोबत असणार आहेत.

गोकुळची निवडणूक जाहीर होताच ही सर्व यंत्रणा गतीमान होईल. गोकुळ निवडणूकीबाबत आमच्या 'युनिटी' बाबात अनेक ठिकाणी बोलले जाते. पण काही काहीही म्हंटले तरीही ही युनिटीच गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन करणार आहे. असा विश्‍वासही पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT