government employees issues for time table  
कोल्हापूर

शनिवारची सुट्टी मिळाली पण...सरकारी कर्मचारी हैराण

सकाळ वृत्तसेवा

पन्हाळा : शासकीय कर्मचाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या या दोन हक्‍काच्या सुट्यासह पाच दिवसांच्या आठवड्यानुसार पहिल्या आणि तिसऱ्या अशा दोन शनिवारच्या जादा सुट्या मिळाल्या. या खुशीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज सकाळी पावणेदहा वाजता कार्यालयात हजर राहताना त्यांची चांगलीच कसरत करावी लागली. महिला कर्मचाऱ्यांनी तर दुपारचा डबा घेवून, एस टी पकडून कार्यालयात वेळेत हजर राहण्यासाठी आज भंबेरी उडाल्याचे चित्र पन्हाळ्यात पाहावयास मिळाले. 

शासनाच्या धोरणानुसार सर्वच शासकीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. बहुतेक कार्यालयातील कर्मचारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहात नाहीत. आपापल्या गावातून या कर्मचारी घरचे काम आटोपून दुपारचा डबा घेवून एसटीने अगर वडापच्या गाडीने कार्यालयात वेळेत पोहाचण्याचा प्रयत्न करतात.आणि सायंकाळी साडेपाच वाजले की वेळेत वाहन पकडून घरी जाण्याची घाई करतात; पण आता दोन जादा सुट्या मिळाल्याने कार्यालयांची वेळ सकाळी पावणेदहा ते सायंकाळी पावणेसहा झाल्याने महिला कर्मचाऱ्यांची खरी गोची झाली आहे. एकतर वेळेत गाड्या मिळत नाहीत. त्यामुळे धावाधाव करून बसस्थानकावर यावे तर एकतर गाडी गेलेली असते किंवा वेळाने तरी सुटणारी असते. त्यामुळे वेळ झाला तर अधिकाऱ्यांचे बोल आणि लवकर सुटावे तर घरच्यांची पंचाईत अशी अवस्था झाल्याने नको त्या दोन सुट्या असे म्हणण्याची वेळ आज पहिल्याच दिवशी या महिला कर्मचाऱ्यांवर आली आहे. 

पक्षकारांतूनही जादा दोन सुट्यांमुळे असंतोष व्यक्‍त होत असून अगोदरच कामे वेळेत होत नाहीत. तीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास करून तालुक्‍याच्या ठिकाणी यायचे आणि त्याचवेळी एकतर कर्मचारी किंवा अधिकारी हजर नसला तर परत दुसरा फेरा मारायचा. अधिकारी, कर्मचारी वेळेत हजर असले तरी संगणकाचा सर्व्हर असेलच असे नाही. त्यामुळे एका कामासाठी तीन ते चार फेऱ्या मारून वैतागलेले पक्षकार शासनाच्या नव्या धोरणावर नाराजी व्यक्त करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT