grandparents home care center story in ghosarwad वृध्दाश्रमातील पाणावलेल्या डोळ्यांना मुलांची  
कोल्हापूर

ते पाहताहेत पाणावलेल्या डोळ्यांनी मुलांची 'आस'... 

गणेश शिंदे

जयसिंगपूर (कोल्हापूर) : लॉकडाऊनच्या काळात विखुरलेली कुटुंबे एकत्र आली. शहरातील नोकरदारही कुटुंबात रमले. मात्र, ज्यांनी मुलांना शिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविले त्याच मुलांना आज आई-वडील का नकोसे झाले असतील? मुलांची आतुरतेने डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्या वयोवृध्दांचे डोळे पाणावले तरी मुलांना मात्र पाझर फुटत नाही. घोसरवाड (ता.शिरोळ) येथील जानकी वृध्दाश्रमातील हे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य लॉकडाऊनधील एकत्र कुटुंबाच्या व्याख्येलाच छेद देणारे ठरले आहे. 

    घोसरवाडच्या बाबासाहेब पुजारी यांनी जानकी वृध्दाश्रमात तीसहून अधिक वृध्दांना निवारा दिला आहे. अगदी घरच्यांप्रमाणे त्यांची देखरेख ठेवतात. मात्र त्यांचीही आर्थिक स्थिती बेताची असल्याने लोकसहभागातून सध्या वयोवृध्दांचा सांभाळ केला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात पुण्या, मुंबईतील नोकरदार गावाकडील घरी एकत्र आले. कुटुंबवeत्सल अशी भूमिका त्यांच्याकडून बजावली जात आहे. आपले कुटुंब किती एकसंघ आहे हे दाखविण्याचा सोशल मिडीयातून प्रयत्नही सुरु आहे. मात्र, यात आपल्या आई-वडीलांची उणीव त्यांना भासली नाही हेच मोठे दुर्दैव आहे. 


लॉकडाऊनमधील व्यथा; ‘जानकी'तील मन सुन्न करणारे वास्तव  

  पुजारी कुटुंबियांनी वृध्दाश्रमातील सर्वांचीच खाण्यापिण्यासह आरोग्याची चांगली काळजी घेतली असली  तरी रक्ताच्या नात्यांनी केलेल्या सेवेमुळे आयुष्य सार्थक बनते अशीच भावना वृध्दाश्रमातील वृध्दांची आहे. मात्र, त्यांची हि भावना आज तरी स्वप्न बनून राहिली आहे. लॉकडाऊन सुरु होण्याआधी वृध्दाश्रमाच्या व्यवस्थापनाने तेथील वृध्दांना घरी घेऊन जाण्याबाबत कळविले खरे पण कोणालाही त्यांच्यासाठी वेळ मिळाला नाही. मुलांसह नातवांच्या आठवणींनी व्याकूळ झालेले, आयुष्यभर मुलांच्या भवितव्यासाठी राबलेले हात आता मात्र वयोमानामुळे थकले आहेत. चार दिवस तरी मुले आपल्या घरी न्यायला येतील या भाबड्या भावनेने वृध्दांचा जीव डोळ्यात आला आहे. पण आई-वडीलांशिवाय कुटुंबात रमलेल्या मुलांना त्यांच्या भावना कळायला मात्र वृध्दत्वच यावे लागणार आहे. 

थकलेल्या पावलांची अशीही वाट 

अनेकांनी वृध्दांना देव दर्शनाचे तर काहींनी दवाखान्यात जाण्याचे निमित्त करुन घरातील आई-वडीलांना घेऊन गेले. मात्र, देवदर्शन अथवा दवाखान्याला न जाता देवस्थानच्या ठिकाणी बसस्थानकावर सोडून पसार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पाणावलेल्या डोळ्यांनी वृध्द आपल्या व्यथा सांगतात खरे पण मुलांप्रती त्यांच्यातील प्रेम जराही कमी झाले नसल्याचेही ठळकपणे अधोरेखीत होते. 

अनेक कारणे सांगून वृध्दांना अनोळख्या शहरात सोडण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा वृध्दांना जानकी वृध्दाश्रमाने आधार दिला आहे. लोकसहभागातून आज त्यांना सांभाळले जात आहे. अनेक दानशूरही याकामी पुढे येत आहेत. अनेक जण आपला, आपल्या लग्नाचा वाढदिवस वृध्दाश्रमात वृध्दांबरोबर साजरा करुन वृध्दांच्या दु:खावर फुंकर घालतात. 

- माणिक नागावे (सल्लागार मंडळाच्या अध्यक्षा, जानकी वृध्दाश्रम‘) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT