Heads up: chatting on whats app
Heads up: chatting on whats app 
कोल्हापूर

सावधान ः व्हॉट्सअॅवपवर चॅटिंग करताय

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः वादग्रस्त व्हिडीओ, चिथावणीखोर मेसेज पाठविणाऱ्या आणि फॉर्वर्ड करणाऱ्या चौघांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. व्हिडीओ क्‍लीप इतरांच्या व्हॉटस्‌ ऍप नंबरवर, ग्रुपमध्ये पाठवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी सांगितले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिथावणीखोर मॅसेज व व्हिडीओ क्‍लीप शेअर केल्याबद्दल सादीक सलीम शेख (रा.प्लॉट नं.20, संजय गाधी हौसिंग सोसायटी, कदमवाडी) आणि तातोबा बाबुराव जगदाळे (आंबवडे, ता. पन्हाळा) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. तसेच "सीके प्रेमी' या व्हॉटसअप ग्रुपवर वादग्रस्त मॅसेज फॉर्वर्ड केल्याबद्दल महादेव बबन गचाटे (गडमुडशिंगी, ता. करवीर) तसेच "कै. ऋषिकेश आठवण' या ग्रुपवर भावना भडकवणारे मॅसेज पाठविल्याबद्दल अमित शंकर वायदंडे (कपूर वसाहत, कदमवाडी) यांच्यावर गुन्हे नोंदवले आहेत.

दानोळीतील दोघांवर गुन्हा 
जयसिंगपूर ः
सोशल मीडियावरून अफवा पसरविल्याबद्दल दानोळी (ता. शिरोळ) येथील दोघांविरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्या फिर्यादीनुसार ग्रुप ऍडमिन अनिकेत सुरेश पाटील (वय 26) व दीपक गुंडू पाटील याने मेसेस फॉरवर्ड केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. रविवारी ग्लोबल सेल्स दानोळी या व्हॉटस ऍप ग्रुपवर दिल्लीतील निजामुद्दीन मरकजबाबत मेसेस फॉरवर्ड केल्याचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT