heavy rain in kolhapur desert farmer crops Damage 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात ढगफुटी सदृश्य पावसाचे थैमान

राजू पाटील

राशिवडे  बुद्रुक : आज दुपारी येळवडे, पुंगाव. शिरगाव आणि धामोड परिसरामध्ये अक्षरश: ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले. केवळ 70 मिनिटात या परिसरात 110 मिलिमीटर पाऊस झाला. अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. पावसाची आक्रमकता पाहून तुळशी धरणातून 749 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करणे भाग पडले. अचानक आलेल्या पावसामुळे  भांबेरी उडाली. भात पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

 सकाळपासून उघडीप होती. मात्र बारानंतर पावसाचे वातावरण दिसून आले आणि अचानक दुपारी सव्वा एक वाजल्यापासून पावसाने धुवाधार सुरुवात केली. अर्धा तास अक्षरशः पावसाने झोडपून काढले. पाणीच पाणी झाल्याने लोकांची  त्रेधातिरपीट उडाली. अनेक घरांमध्ये पाणी शिरले.

येळवडे येथे महालक्ष्मी कापड दुकान आणि किराणामाल दुकानासह ग्रंथालयांमध्ये पाणी गेल्याने सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. पुंगाव, शिरगाव परिसरातही प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने कापणी योग्य झालेल्या भाताला फटका बसला आहे. तर कापणी केलेले भात अर्ध्यावर टाकून शेतकऱ्यांना शिवारातून बाहेर येणे भाग पडले.

धामोड परिसरातील तुळशी धरण क्षेत्रावर झालेल्या पावसाने पाणलोट क्षेत्रातून प्रचंड ओघ आला आणि धरणामध्ये पाणी वाढू लागल्याने या धरणातून 749 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. या परिसरात 70 मिनिटात 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

येळवडे येथील धनाजी कांचनकर यांच्या कापड दुकानात पाणी शिरल्याने सुमारे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले. येथील कैलास सरवळकर यांच्याही दुकानात पाणी शिरले. ओम शिव गोरक्ष सार्वजनिक ग्रंथालयात पाणी शिरले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे नुकसान झाले आहे. तलाठी शहाजी चिंदगे यांनी भेट देवून पाहणी केली.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : इस्रायलच्या हल्ल्याला अमेरिकेची साथ; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ''इराण कधीही...''

Pimpri Chinchwad Noise: कर्णकर्कश सायलेन्सरवर ‘रोडरोलर’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची ३६८ दुचाकींवर धडक कारवाई

Latest Marathi News Live Update : मेहरूण तलाव वाचवण्यासाठी जळगावात आजपासून आमरण उपोषण

Agriculture News : ४३० एकरवरील फुलशेती कोमेजली! हक्काच्या बाजारपेठेसाठी शेतकरी आता मुख्यमंत्र्यांच्या दारी

Board Exam Teacher Harassment : शिक्षण क्षेत्राला काळिमा! बोर्डाचा पेपर द्यायला आलेल्या मुलीचा मोबाईल नंबर घेतला आणि...; छेड काढणाऱ्या शिक्षकाला केंद्रावरच चोपलं

SCROLL FOR NEXT