Help to stop patient affordability in ichlkarnji kolhapur marathi news 
कोल्हापूर

इचलकरंजीत परप्रांतीयांसाठी असाही दिलासा...

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. त्यांनाही कोरोनाच्या धास्तीने आपल्या गावाकडची ओढ लागली आहे. त्यामुळे मुंबईतील वांद्रेच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजीतील प्रशासन आज सतर्क झाले.प्रशासनाने तातडीने शहरातील सर्वच उद्योगातील घटकांची तातडीने बैठक घेवून परप्रांतीय कामगारांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याच्या सूचना केल्या. उद्योजकांनीही अशा कामगारांना घरच्याप्रमाणे सांभाळण्याची हमी दिली. सर्वच कामगारांना घरपोच जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कोरोनाचा धसका समाजातील प्रत्येक घटकांने घेतला आहे. विशेष करुन मोठ्या शहरातील कामगार वर्ग आपापल्या गावी जाण्याच्या मानसिकतेत आहे. यातूनच काल मुंबईतील वांद्रे येथे हजारो कामगार एकत्र जमले. इचलकरंजीतही सुमारे 9 हजार परप्रांतीय कामगार आहेत. त्यामुळे वांद्रेसारखा प्रकार घडण्याच्या धास्तीने आज प्रशासनाने पालिका सभागृहात उद्योजकांच्या संघटनांची बैठक घेतली.यावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रांताधिकारी डॉ.विकास खरात अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, तहसिलदार प्रदीप उबाळे आदी उपस्थीत होते.

शहरातील एकही परप्रांतीय कामगार उपाशी राहणार नाही, याची व्यवस्था केली आहे. मालक वर्गाने त्याची जबाबदारी घेतली आहे. कामगारांना घरपोच जेवण देण्यात येत आहेत. 20 एप्रिलनंतर यंत्रमाग उद्योग सुरु करण्यासाठी शासना पातळीवर प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती आमदार आवाडे यांनी यावेळी दिली.
कोल्हापूर जिल्हा तर ऑरेंज झोनमध्ये असला तरी हातकणंगले तालुका ग्रीन झोनमध्ये असून टप्प्याटप्प्याने उद्योग सुरु करण्याबाबत प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी सूचना माजी आमदार हाळवणकर यांनी केली. प्रांताधिकारी खरात यांनी परप्रांतीय कामगारांची घरच्याप्रमाणे व्यवस्था करण्याचे निर्देश उद्योजकांना दिले

बैठकीतील महत्वाचे मुद्दे
बँकांची वेळ सकाळी 8 ते 10 करणे.
खासगी दवाखाने 100 टक्के सुरु राहतील.
रेशनप्रश्‍नी शिक्षक नोडल ऑफीसर असतील.
तालुका ग्रीन झोन होण्यासाठी प्रयत्न करणे.
धान्य वाटपावेळी पोलीस बंदोबस्त देणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : राज्यात कुठं कुणाचा नगराध्यक्ष? दिवसभरातील निकालासंदर्भातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Accident News:'अपघातात आर्टिकामधील तिघे ठार तर दोन जखमी'; धरणगाव-धुपेश्वर रोडवरील घटना, चालकाचे नियंत्रण सुटल अन्..

Jejuri Fire Incident Video : निवडणुकीच्या विजय जल्लोषादरम्यान मोठी आग; दोन नवनिर्वाचित नगरसेवक भाजले, अनेक लोक जखमी, जेजूरीतील धक्कादायक Video समोर...

Gadchiroli Municipal Result: गडचिरोलीत काँग्रेस उमेदवाराचा अवघ्या 'एका' मताने विजय; पराभूत मांडवगडेंचा निकालावर आक्षेप!

Mahabaleshwar Municipal Polls: महाबळेश्‍‍वरमध्‍ये राष्‍ट्रवादीने घडविला इतिहास!नगराध्‍यक्षपदासह १३ जागांवर विजय; भाजपला एक अन्..

SCROLL FOR NEXT