Holi Festival 2023  sakal
कोल्हापूर

Holi Festival 2023 : यंदाही होळी लहान, पोळी दान!

पर्यावरणपूरक सण साजरा करण्यावर भर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : होळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सज्ज झाली असून, यंदाही ‘होळी लहान, पोळी दान’ या उपक्रमावर भर दिला जाणार आहे. सार्वजनिक मंडळे प्रतीकात्मक होळी साजरी करून शेणी स्मशानभूमीला देणार आहेत. याबाबतचे आवाहन महापालिकेसह विविध सेवाभावी संस्थांनी केले आहे.

दरम्यान, सोमवारी (ता. ६) होळीचा सण सर्वत्र साजरा होणार आहे. पर्यावरणपूरक होळीचा सण साजरा करताना कोल्हापूरकरांनी नेहमीच विधायकतेचा विचार जपला आहे. रस्ते खराब होऊ नयेत, या उद्देशाने प्रतीकात्मक पाच शेणींची आणि तीही तरंगती होळी साजरी होणार आहे.

बाजारपेठेत विविध आकारातील टिमक्या उपलब्ध असून, खरेदीसाठी गर्दी होत आहे. ताशा स्क्रू, बुट्टी ताशांची यंदा क्रेझ आहे. प्लास्टिक आणि स्टील फ्रेममधील या ताशांना मोठी मागणी आहे. याबाबत साजीद मोमीन म्हणाले, ‘‘चामडे महाग असल्यामुळे बुट्टी ताशांना मागणी आहे. टिमकी व हे ताशे ऐंशी रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्यावर पाणी पडले तरी ते खराब होत नाहीत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, निफ्टीही 23 हजारांखाली; कोणते शेअर्स घसरले?

Ashok Chavan Audio Clip : “थांबा जरा, शांत रहा, शिव्या खा”; अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ

पुण्यातील पेठांमध्ये राहणं शिक्षा, नागरिक पळून जातायत : विद्यानंद बापट

अमेरिकेत अश्विनी भावेंच्या घरी पोहोचला बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता, जंगी स्वागत, एकत्र जेवण अन्...

Navi Mumbai: जनतेच्या पैशांवर 'अमेरिका वारी', नवी मुंबईच्या महापौरांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT