hospital ignore by pregnant women situation can register for her pregnancy in belgaum 
कोल्हापूर

'तिच्या' प्रसूती वेदना सुरू होत्या; तिकडे पती कोरोना पाॅझिटिव्ह; पण डाॅक्टर मात्र...

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : प्रसूती वेदना सुरू असतानाही रुग्णालयात गर्भवतीला दाखल करून घेण्यास टाळाटाळ झाल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. खासगी रुग्णालयात बाळंतपणानंतर महिलेची स्थिती गंभीर बनल्याने तिला अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. गर्भवतीला झालेल्या त्रासाबाबत तिच्या कुटुंबीयांनी पोलिस स्थानकात धाव घेतली. यामुळे कोरोना काळात सर्व रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत असल्याच्या जिल्हा प्रशासनाच्या दाव्याला खीळ बसली आहे.

बाळेकुंद्री खुर्द परिसरातील गर्भवती बैलहोंगल येथे माहेरी गेली होती. कोरोनाबाधित आढळल्यानंतर तेथील कोरोना उपचार केंद्रात दाखल केले. प्रशासनाकडून सकस आहार आणि गरम पाणी दिले जात असल्याचे सांगितले जात आहे, पण कोणतीच सुविधा गर्भवतीला कोरोना केंद्रात दिली नाही. आठ दिवसांनंतर तिला घरी सोडले. तेथेे व्यवस्थित उपचार होणार नसल्याने महिलेला बाळेकुंद्री खुर्द येथे सासरी आणले. महिलेचा पतीही कोरोनाबाधित झाल्याने सर्वांना घरातच क्वारंटाईन केले. प्रसूतीचा काळ जवळ आल्याने तिला मुतगा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

येथे वैद्याधिकाऱ्यांनी तपासणी करुन प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रातच करण्यास सांगितले. मात्र, गुरुवारी रात्री वैद्याधिकारी नसताना बाळेकुंद्री खुर्द येथील आशा कार्यकर्त्यांनी संबंधित महिला कोरोनाबाधित असल्याची माहिती तेथील परिचारिकेला दिली. त्यामुळे परिचारिकेने तिच्याकडे दुर्लक्ष केले. महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्यानंतरही दखल घेतली नाही. महिलेचा पती कोरोनाबाधित असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावून घेतले. पतीसमवेत गर्भवतीला रात्री खासगी रुग्णालयाचे रेफरन्स पत्र देऊन बाहेर काढले.

महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतरच्या उपेक्षेमुळे गर्भवतीचा रक्तदाबही वाढला. रेफरन्स पत्र असलेल्या खासगी रुग्णालयातही तिला कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल नसल्याचे कारण देत दाखल करुन घेण्यास टाळाटाळ झाली. अखेर तिला वडगावातील खासगी रुग्णालयात दाखल केले असून प्रसूतीनंतर रक्तदाब वाढल्याने अतिदक्षता विभागात दाखल केले. हे प्रकरण मारिहाळ पोलिस स्थानकापर्यंत पोचले असून संबंधित आशा कार्यकर्ता आणि परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.

"प्रसूती कळा सुरू झाल्यानेच गर्भवतीला रेफरन्स लेटर देऊन दुसऱ्या रुग्णालयात पाठविले. मात्र, नामसाधर्म्यामुळे ते वेगळ्याच रुग्णालयात गेले. तेथून त्यांना रेफरन्स असलेल्या रुग्णालयात जाणे आवश्‍यक होते, पण ते खासगी रुग्णालयात दाखल झाले. आतापर्यंत सर्व गर्भवतींवर यशस्वी उपचार केले आहेत. या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे." 

- डॉ. शशिकांत मुन्याळ, जिल्हा आरोग्याधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT