कोल्हापूर : पुणे, मुंबईसह इतर जिल्हे आणि राज्यातील कोरोना रेडझोन क्षेत्रातून येणाऱ्या लोकांना स्वॅब घेणे बंधनकारक आहे. तसेच, स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतरही चौदा दिवसांचे अलगीकरण (क्वारंटाईन) सक्तीचे करावे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोना रुग्णालय, केअर सेंटर आणि हेल्थ सेंटरमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तींच्या अलगीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत धोरण निश्चित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
पुढे बोलताना देसाई म्हणाले, जिल्ह्यात रेड झोन, कंन्टेनमेंट झोन किंवा इतर राज्ये किंवा परदेशातून लोक आले आहेत. अशा व्यक्तींची सक्तीने तपासणी करावी. स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना शासकीय संस्थात्मक अलगीकरणात रवानगी करावी. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना खासगी हॉटेलमध्ये स्वखर्चाने राहता येईल. याशिवाय, कोल्हापूर जिल्ह्यात कोठूनही विना परवानगीने आलेल्या व त्यांची परत पाठवणी शक्य नसल्यास अशा सर्व व्यक्तींची सक्तीने स्वॅब तपासणी करण्यात यावी व शासकीय संस्थात्मक अलगीकरण करावे.
हे पण वाचा - लाॅकडाऊन उठविल्यानंतरही उद्योजकांसमोर आहेत या अडचणी
गृह अलगीकरण (होम क्वारंटाईन)
कोल्हापूर जिल्ह्याबाहेरुन ग्रीन व ऑरेंज झोन जिल्ह्यामधून (परंतु कंन्टेनमेंट क्षेत्र वगळून) आलेल्या व्यक्तींना कोणतीही कोरोना सदृश्य लक्षणे नसल्यास गृह अलगीकरणात ( होम क्वारंटाईन) पाठवावे. परंतु याबाबतचा अंतिम निर्णय ग्राम, प्रभाग समितीचा राहील. ग्राम समितीने, प्रभाग समितीने अशा व्यक्तींना राहण्यासाठी स्वतंत्र घर, खोली, वस्तीवर घर आहे. याची खात्री करावी व फक्त अशा व्यक्तींनाच गृह अलगीकरणात ठेवावे. अन्यथा ग्राम समितीने अशा स्वतंत्र सुविधा नसलेल्या व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात पाठविण्याचा निर्णय घ्यावा, अशाही सूचना श्री देसाई यांनी दिल्या आहेत.
गरोदर महिलांसाठी
कोल्हापूर जिल्ह्याबाहेरुन आलेल्या व कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे नसलेल्या विशेष गरज असलेल्या व्यक्ती म्हणजेच मनोरुग्ण, गरोदरपणाच्या शेवट्या तिमाहीतील स्त्रिया, विकलांग व्यक्ती यांच्याबाबतीत त्यांना राहण्यासाठी घरी स्वतंत्र खोली व इतर व्यवस्था आहे याची
खात्री हमी पत्र घेवून गृह अलगीकरण (होम क्वारंटाईन) करावी. मात्र, रेड झोन, बाधित क्षेत्र किंवा कंन्टेनमेंट झोनमधून आल्या असल्यास
त्यांचे त्वरित स्वॅब घेवून अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना गृह अलगीकरण करावे. घरी राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही अशी ग्राम समिती, प्रभाग समितीची खात्री झाल्यास नजिकच्या संस्थात्मक अलगीकरणात पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
14 दिवस संस्थात्मक अलगीकरण
कोल्हापूर जिल्ह्यात येण्यापूर्वी संस्थात्मक अलगीकरणात राहून 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींना (सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर केल्यास) कोणतीही कोरोना सदृश्य लक्षणे नसल्यास प्राथमिक तपासणीनंतर गृह अलगीकरणात पाठवावे. मात्र अशा व्यक्तीचा प्रवास इतिहास जर रेड झोन क्षेत्र, बाधित क्षेत्रामधून असल्यास त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरणात पाठविण्याचे सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.